Mahabreaking

[breaking_news]

Three hockey teams :बुलढाण्याच्या मैदानातून महाराष्ट्राचे तीन हॉकी संघ सज्ज! राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड

Three hockey teams : क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी राज्यभरातून बुलढाण्यात दाखल झालेल्या हॉकीपटूंनी मैदानावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. १२ ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विविध विभागांतील संघांनी विजयासाठी जोरदार चुरस निर्माण केली. या स्पर्धेच्या निमित्ताने आगामी ७० व्या राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील मुलांच्या, मुलींच्या आणि १७ वर्षांखालील मुलींच्या संघांची घोषणा करण्यात आली.

Three hockey

राज्यस्तरीय हॉकीचा बुलढाण्यात जल्लोष; १४ वर्षांखालील मुले-मुलींसह १७ वर्षांखालील मुलींचा संघ जाहीर

बुलढाणा : क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी राज्यभरातून बुलढाण्यात दाखल झालेल्या हॉकीपटूंनी मैदानावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. १२ ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विविध विभागांतील संघांनी विजयासाठी जोरदार चुरस निर्माण केली. या स्पर्धेच्या निमित्ताने आगामी ७० व्या राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील मुलांच्या, मुलींच्या आणि १७ वर्षांखालील मुलींच्या संघांची घोषणा करण्यात आली.

स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहकार विद्या मंदिर येथे पार पडला. यावेळी १४ वर्षांखालील मुलांच्या गटात पुणे विभागाने प्रथम क्रमांक पटकावला. कोल्हापूर विभाग द्वितीय, तर मुंबई विभाग तृतीय क्रमांकावर राहिला. मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाने बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला. पुणे विभागाने द्वितीय, तर मुंबई विभागाने तृतीय क्रमांक पटकावला.

१७ वर्षांखालील मुलांच्या गटात मिशन लक्षवेध, पुणे संघाने प्रथम क्रमांक मिळविला. कोल्हापूर विभागाने द्वितीय, तर क्रीडा प्रबोधिनीने तृतीय क्रमांक मिळविला. याच वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत कोल्हापूर विभागाने प्रथम क्रमांक पटकावला. मुंबई विभाग द्वितीय, तर नागपूर विभाग तृतीय क्रमांकावर राहिला.

या समारोपीय कार्यक्रमाला सहकार विद्या मंदिरचे प्राचार्य अलगर सामी, ऑलिम्पिक खेळाडू अजित लाक्रा, जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे, तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर, प्रशांत मंडले, बुलढाणा जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव प्रकाश खेत्रे, सेवानिवृत्त तालुका क्रीडा अधिकारी उमेश बडवे, सुशील सुर्वे, राज्य क्रीडा मार्गदर्शक वैशाली सुळ, आरती हळगीळ आणि निवड समिती सदस्य सय्यद आबिद यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांतील खेळाडूंना पदके व चषक प्रदान करून गौरविण्यात आले.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे तीन संघ सज्ज!

राज्यस्तरीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे आगामी ७० व्या राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या तीन संघांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये १४ वर्षांखालील मुलांचा, १४ वर्षांखालील मुलींचा आणि १७ वर्षांखालील मुलींचा समावेश आहे. निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

१४ वर्षांखालील मुलांचा संघ मंदसौरमध्ये खेळणार

मध्य प्रदेशातील मंदसौर येथे ८ ते १२ डिसेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघात अभिषेक चौधरी (पुणे), अमान शेख (मुंबई), आयुष माने (मुंबई), शहाजी घुमरे (पुणे), ओमकार डोंगरे (पुणे), स्वर पाटील (कोल्हापूर), तौसीफ म्हाळदार (कोल्हापूर), रणवीर नागलोत (पुणे), स्वराज साळुंके (मुंबई), परमवीरसिंग पुजारी (लातूर), अदनान सनदी (कोल्हापूर), अनुज पाटील (नाशिक), रुद्र शिंदे (छत्रपती संभाजीनगर), अंश राऊत (नागपूर), मोहित पानगव्हाणे (नाशिक), हर्षल बावणे (अमरावती), विराज जाधव (कोल्हापूर) आणि संकेत राठोड (अमरावती) यांची निवड झाली आहे.

राखीव खेळाडूंमध्ये विराज पाटील, श्रेयस यादव (दोघेही कोल्हापूर), शिल तामगाडगे (नागपूर), रयान अहमद (अमरावती), मानव महाले (पुणे), सिद्धांत संजयकुमार (अमरावती) आणि मंधन खवले (नागपूर) यांचा समावेश आहे.

ग्वाल्हेरमध्ये १४ वर्षांखालील मुलींची राष्ट्रीय स्पर्धा

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे २० ते २४ डिसेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात पूजा गिरे (मुंबई), माही बेलदार, साक्षी नाळे (पुणे), तन्विका चिक्रोड (लातूर), स्नेहा सिंग (छत्रपती संभाजीनगर), अपूर्वा निरगुडे (नाशिक), रिया खुरसुंगे (अमरावती), ओवी पारखे, रेणुका जगताप (मुंबई), जयश्री खोके (नागपूर), आराध्या सोनवणे, वैभवी राहीगुडे, आरोही नवले (कोल्हापूर), अर्चना खर्डे (मिशन लक्षवेध, पुणे), विशाखा महाजन (पुणे), आरोही वळवी (नाशिक), शरयू गुळमकर (पुणे) आणि अनुष्का कारंजकर (सांगली) यांची निवड झाली आहे.

या संघासाठी राजवर्धिनी शिंदे, शाल्वी केसरकर, श्रुष्टी पाटील (कोल्हापूर), सुप्रिया गावीत (मिशन लक्षवेध, पुणे), कायरा पालकर, श्रेया साळवी (मुंबई) आणि ग्रिषा साळवी (नाशिक) यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

१७ वर्षांखालील मुलींचा संघ रांची येथे खेळणार

झारखंडमधील रांची येथे २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघात देविका नायर (मुंबई), डिम्पी जाधव (अमरावती), मृण्मयी घोरपडे (कोल्हापूर), आझील शेख (पुणे), लावण्या बावणे, मोनाली सरगर (क्रीडा प्रबोधिनी, छत्रपती संभाजीनगर), सरिता वसावे (नाशिक), अदिती शेट्टी (मुंबई), वेदिका वाघमोरे (कोल्हापूर), देवयानी सुपलकर (क्रीडा प्रबोधिनी, छत्रपती संभाजीनगर), गायत्री खरात (कोल्हापूर), अन्वी रावत, प्राची कटरे (मिशन लक्षवेध, पुणे), अनुराधा टेकाळे (लातूर), रिया बगमारे (नागपूर), ऋतुजा पाटील, फाल्गुनी पिल्लारे (अमरावती) आणि सई सावंत (नाशिक) यांची निवड झाली आहे.

राखीव खेळाडूंमध्ये तन्वी जोगदंड (अमरावती), आरोही पाटील (कोल्हापूर), श्रावणी निरभवणे (नाशिक), अप्रिता कोढारे (मिशन लक्षवेध, पुणे), केलेन नेल्सामणी (पुणे), शगुन शर्मा (मुंबई) आणि अक्षरा भारसाकळे (क्रीडा प्रबोधिनी, छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेतून निवड झालेल्या तिन्ही संघांकडून आगामी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राची मान उंचावणारी कामगिरी अपेक्षित आहे. खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top