Mahabreaking

[breaking_news]

Balapur bus stand :बाळापूर बसस्थानक बनतेय असामाजिक घटकांचा अड्डा? ॲपेचालकावर ब्लेड हल्ल्याने सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे!

Balapur bus stand : शहरातील बाळापूर बसस्थानक परिसरात असामाजिक घटकांच्या कथित वावरामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आर्थिक देवाणघेवाणीच्या किरकोळ वादातून एका ॲपे ऑटोचालकाच्या मानेवर ब्लेडने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

balapur

महिला प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर; बसस्थानकात टवाळखोरांचा वावर, ॲपेचालकाच्या मानेवर ब्लेडचे वार!

बाळापूर : शहरातील बाळापूर बसस्थानक परिसरात असामाजिक घटकांच्या कथित वावरामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आर्थिक देवाणघेवाणीच्या किरकोळ वादातून एका ॲपे ऑटोचालकाच्या मानेवर ब्लेडने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

balapur

प्राप्त पोलीस तक्रारीनुसार, बेलदारपुरा येथील एका ॲपे ऑटोचालकाकडे कसाई वेस येथील दुसऱ्या ॲपे ऑटोचालकाने पैशांची मागणी केली. मात्र, सध्या पैसे नसल्याचे सांगितल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या आरोपीने दुकानातील ब्लेड आणून संबंधित ऑटोचालकाच्या मानेवर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.

या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ३५२ आणि ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा एएसआय संतोष भोजने यांनी दाखल केला असून, पुढील तपास पीएसआय वैशाली पाटील करीत आहेत.

प्रवाशांच्या आसन व्यवस्थेवर टवाळखोरांचा ठिय्या!

बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या आसन व्यवस्थेवर काही टवाळखोरांचा कथित ठिय्या असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. बसची प्रतीक्षा करण्यासाठी असलेल्या या जागेवर काही तरुण तासन्‌तास बसून राहतात. येणाऱ्या-जाणाऱ्या महिला, युवती आणि विद्यार्थिनींकडे टक लावून पाहणे, विनाकारण टिप्पणी करणे तसेच टवाळखोरी करणे असे प्रकार घडत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

बसची प्रतीक्षा करणाऱ्या महिला आणि विद्यार्थिनींना अशा प्रकारांमुळे अस्वस्थतेचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. प्रवाशांसाठी निर्माण केलेल्या सुविधांवरच टवाळखोरांचा कब्जा असेल, तर सर्वसामान्य प्रवाशांनी जायचे कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टवाळखोरी, नशेखोरीवर कारवाई कधी?

बसस्थानक परिसरात कथित टवाळखोरी, नशेखोरी आणि महिलांना त्रास देण्याच्या प्रकारांबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच ऑटोचालकावर ब्लेडने हल्ला झाल्याच्या घटनेने परिसरातील सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. बसस्थानक हे दररोज शेकडो प्रवाशांच्या येण्या-जाण्याचे महत्त्वाचे ठिकाण असताना येथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मोठ्या दुर्घटनेची वाट पाहताय का?

बसस्थानक परिसरात नियमित पोलीस गस्त घालणे, संशयास्पदरीत्या फिरणाऱ्यांवर लक्ष ठेवणे, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवणे आणि टवाळखोरांसह असामाजिक घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. महिला व युवतींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन पोलीस प्रशासन आणि संबंधित परिवहन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top