Mahabreaking

[breaking_news]

Havoc caused :साखरखेर्ड्यात अज्ञात तापाचा कहर? १६ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; परिसरात हळहळ

Havoc caused : साखरखेर्डा येथील १६ वर्षीय विद्यार्थ्याचा अज्ञात तापामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १३ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. सिद्धार्थ किरण इंगळे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो श्री शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. या घटनेमुळे साखरखेर्डा परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पिंपळगाव सोनारा येथील आठ वर्षीय बालकाचाही तापामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरात आढळणाऱ्या या तापाचे नेमके स्वरूप काय, याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Havoc caused

दहा दिवसांच्या तापाशी झुंज अपयशी; पित्याचे छत्र हरविलेल्या सिद्धार्थची मृत्यूशी झुंज संपली

साखरखेर्डा  : साखरखेर्डा येथील १६ वर्षीय विद्यार्थ्याचा अज्ञात तापामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १३ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. सिद्धार्थ किरण इंगळे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो श्री शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. या घटनेमुळे साखरखेर्डा परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पिंपळगाव सोनारा येथील आठ वर्षीय बालकाचाही तापामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरात आढळणाऱ्या या तापाचे नेमके स्वरूप काय, याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

साखरखेर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप आश्रू इंगळे यांचा पुतण्या सिद्धार्थ किरण इंगळे (वय १६) याला गेल्या दहा दिवसांपासून सतत ताप येत होता. त्याच्यावर साखरखेर्डा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच १३ नोव्हेंबर रोजी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. काही वर्षांपूर्वीच वडिलांचे छत्र हरवल्याने सिद्धार्थचा सांभाळ त्याची आई करीत होती. मुलाच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पिंपळगाव सोनारा येथील स्वराज कैलास गवई (वय ८) या बालकाचाही तापामुळे मृत्यू झाला होता. त्याला चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, ताप नियंत्रणात न आल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा सल्ला दिला होता. परंतु, उपचारापूर्वीच त्याचीही प्राणज्योत मालवली.

याशिवाय, परिसरात गेल्या तीन महिन्यांत अशाच प्रकारच्या तापामुळे पाच महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तापाचे नेमके निदान वेळेत होत नसल्याने रुग्णांना उपचारासाठी विलंब होत आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या घटनांची आरोग्य विभागाने गांभीर्याने दखल घेऊन मृत्यूंच्या कारणांचा शोध घ्यावा, तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करावे आणि आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या व उपचारांची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सिद्धार्थ किरण इंगळे याच्या निधनाने साखरखेर्डा परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, त्याच्या कुटुंबीयांप्रती नागरिकांकडून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. त्याचा रक्षा विसर्जन कार्यक्रम १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरी आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top