Horrific collision : भरधाव मालवाहु वाहन आणि दुचाकीची धडक झाल्याने दुचाकीवरील दोघे व मालवाहु चालक गंभीर जखमी झाले. ही घटना संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल-एकलारा मार्गावर बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. जखमींपैकी श्रीकृष्ण गणपत काटोले (वय ५२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार योगेश शेषराव तायडे आणि टाटा एसचा चालक गजानन प्रकाश धुळे यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टाटा एसच्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर; ५२ वर्षीय श्रीकृष्ण काटोले यांचा मृत्यू
संग्रामपूर : भरधाव मालवाहु वाहन आणि दुचाकीची धडक झाल्याने दुचाकीवरील दोघे व मालवाहु चालक गंभीर जखमी झाले. ही घटना संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल-एकलारा मार्गावर बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. जखमींपैकी श्रीकृष्ण गणपत काटोले (वय ५२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार योगेश शेषराव तायडे आणि टाटा एसचा चालक गजानन प्रकाश धुळे यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३० वाय ८३८९ क्रमांकाच्या डिस्कव्हर दुचाकीवरून योगेश शेषराव तायडे आणि श्रीकृष्ण गणपत काटोले हे वरवट बकाल येथून एकलाराकडे जात होते. दरम्यान, वरवट शिवारातील एका शेताजवळ एकलारा येथून वरवटकडे येणाऱ्या एमएच २८ एबी ४९९६ क्रमांकाच्या टाटा एस मालवाहू वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसली.
या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी शेगाव येथे हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना श्रीकृष्ण गणपत काटोले यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, दुचाकीस्वार योगेश शेषराव तायडे आणि टाटा एस चालक गजानन प्रकाश धुळे यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

