Mahabreaking

[breaking_news]

Illegal liquor :डोणगावात अवैध दारूविक्रीचा खुलेआम बाजार! हॉटेल-धाब्यांवर मद्याचे अड्डे; उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष?

Illegal liquor : मेहकर तालुक्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोणगाव व परिसरात सध्या अवैध दारूविक्रीचा व्यवसाय जोरात सुरू असल्याची चर्चा आहे. येथील काही हॉटेल्स आणि धाब्यांवर खुलेआम दारूची विक्री केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी बनावट विदेशी दारूची विक्री होत असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

Illegal liquor

 दारू माफियांचे धाडस वाढले, प्रशासनाचे हात बांधले? डोणगावात नकली विदेशी दारूचीही चर्चा!

डोणगाव : मेहकर तालुक्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोणगाव व परिसरात सध्या अवैध दारूविक्रीचा व्यवसाय जोरात सुरू असल्याची चर्चा आहे. येथील काही हॉटेल्स आणि धाब्यांवर खुलेआम दारूची विक्री केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी बनावट विदेशी दारूची विक्री होत असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

हॉटेल्स आणि धाबे बनले मद्यपींचे अड्डे!

डोणगाव परिसरातील काही छोटे-मोठे हॉटेल्स तसेच महामार्गावरील धाब्यांवर अवैधरीत्या मद्यविक्री आणि मद्यपान सुरू असल्याचे बोलले जात आहे. नियमांना धाब्यावर बसवून काही ठिकाणी दिवसाढवळ्या दारूची विक्री केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे परिसरातील शांतता आणि सामाजिक वातावरण बिघडत असून, महिला व शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

दारूबंदी विभागाचे अधिकारी मूकदर्शक?

अवैध दारूविक्री रोखण्याची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर स्थानिक नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या अवैध व्यवसायाविरोधात ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. संबंधित विभागातील काही अधिकारी आणि अवैध व्यावसायिक यांच्यात आर्थिक साटेलोटे असल्यामुळेच हा व्यवसाय बिनदिक्कत सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या आरोपांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही होत आहे.

नकली विदेशी दारूच्या चर्चेने खळबळ!

डोणगाव परिसरात नामांकित ब्रँडच्या नावाखाली बनावट विदेशी दारूची विक्री होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या प्रकारात तथ्य असल्यास तो अत्यंत गंभीर असून, अशा बनावट मद्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने संशयित ठिकाणांवरील मद्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन त्याची गुणवत्ता आणि वैधता पडताळणे आवश्यक आहे.

कारवाई कधी होणार?

डोणगाव परिसरातील अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, असा सवाल सुजाण नागरिक आणि महिलांकडून उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन डोणगाव परिसरातील हॉटेल्स आणि धाब्यांची सखोल तपासणी करावी. अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर छापे टाकून कठोर कारवाई करावी. तसेच या व्यवसायाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या किंवा त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top