Bharatiya Bauddha Mahasabha : भारतीय बौद्ध महासभा, पातूर तालुक्याच्या वतीने २ नोव्हेंबर २०२६ रोजी चरणगाव (ता. पातूर) येथे महिला ग्रामशाखा कार्यकारणीचे उद्घाटन आणि नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारतीय बौद्ध महासभेच्या चरणगाव महिला ग्रामशाखेचे उद्घाटन; अनिताताई इंगळे अध्यक्षपदी
राहुल सोनोने
वाडेगाव : भारतीय बौद्ध महासभा, पातूर तालुक्याच्या वतीने २ नोव्हेंबर २०२६ रोजी चरणगाव (ता. पातूर) येथे महिला ग्रामशाखा कार्यकारणीचे उद्घाटन आणि नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा महिला अध्यक्षा आयु. इंदुताई मेश्राम, जिल्हा सरचिटणीस आयु. प्रज्ञाताई इंगळे, जिल्हा उपाध्यक्षा आयु. गायकवाडताई, शहर कोषाध्यक्षा आयु. अंभोरेताई यांची उपस्थिती होती.
तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पातूर तालुका अध्यक्ष आयु. राजेश सरकटे, तालुका सरचिटणीस आयु. राहुल अंभोरे, तालुका कोषाध्यक्ष आयु. विजय खंडेराव, तालुका सचिव आयु. रमेश तेलगोटे, तालुका सचिव आयु. बाबुराव अंभोरे, महिला तालुका अध्यक्षा आयु. रीनाताई मोहाडे, तालुका सरचिटणीस आयु. सपनाताई सुरवाडे, तालुका कोषाध्यक्षा आयु. छायाताई ताजने आणि तालुका उपाध्यक्षा आयु. कावेरीताई तेलगोटे उपस्थित होत्या.
यावेळी चरणगाव महिला ग्रामशाखेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये ग्रामशाखा अध्यक्षा म्हणून आयु. अनिताताई इंगळे, सरचिटणीस म्हणून आयु. प्रजावतीताई इंगळे, तर कोषाध्यक्ष म्हणून आयु. वनिताताई इंगळे यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून चरणगाव येथे भारतीय बौद्ध महासभेच्या महिला संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळाली. कार्यक्रमाला ग्रामशाखेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

