Sangeeta Shinde (Bonde):“ शिक्षकांच्या हातात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची कमान असते. त्यामुळे त्यांच्या समस्यांसह आरोग्याची आणि स्वास्थाची काळजी घेणे हे माझे परमकर्तव्य असून तोच माझा शिक्षकधर्म असल्याचे प्रतिपादन शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा तथा भाजपा शिक्षक आघाडीच्या प्रदेश संयोजिका डॉ. सौ. संगीताताई शिंदे (बोंडे) यांनी केले.

संजय तायडे
बोरगाव मंजू (जि. अकोला) : शिक्षकांच्या हातात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची कमान असते. त्यामुळे त्यांच्या समस्यांसह आरोग्याची आणि स्वास्थाची काळजी घेणे हे माझे परमकर्तव्य असून तोच माझा शिक्षकधर्म असल्याचे प्रतिपादन शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा तथा भाजपा शिक्षक आघाडीच्या प्रदेश संयोजिका डॉ. सौ. संगीताताई शिंदे (बोंडे) यांनी केले.
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) आणि शिक्षण संघर्ष संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निशुल्क भव्य सर्व रोगनिदान, उपचार व मोफत शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या.
“शिक्षकांनी आरोग्याबाबत कधीही हाक द्यावी; त्यांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर” – डॉ. महेश चव्हाण
उद्घाटन प्रसंगी अस्थीरोग तज्ञ डॉ. महेश चव्हाण यांनीही शिक्षकांच्या आरोग्याबाबत संवेदनशील भूमिका व्यक्त केली. “शिक्षकांनी आरोग्याच्या कोणत्याही समस्येसाठी कधीही हाक द्यावी, आम्ही नेहमी ‘हो’ म्हणत तत्परतेने सेवा देऊ,” असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास उद्घाटक विनायकराव दाते, प्रा. डॉ. वसंत वाघ,v गंगाधर तडस, डॉ. महेश चव्हाण, निशित पटेल, v निकिता चव्हाण, कृपा पटेल, शुभांगी आवारी, रोहिणी गजभिये, संतोष अंगाईतकर, देवानंद जाधव, प्राचार्य संदीप चावक, किशोर चव्हाण, उदय कानतोडे, देवदत्त भोयर, दुर्शटवार, सुने, विजय विसपुते, नागोराव चौधरी, विठ्ठल परांडे, रवींद्र दुर्शटवार, सुशील घोटेकर, वरभे, अमिनूल्ला खान व शरद तिरमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
मोठ्या संख्येने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सहभाग
यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक बांधव, भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या भव्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.आजच्या धावपळीच्या जीवनात उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे सांगत, या शिबिरात शरीराच्या सर्व अवयवांची मोफत तपासणी करण्यात आली. पुढील आवश्यक उपचारांसाठी लाभार्थ्यांना सावंगी (मेघे) येथे बोलावण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

