Mahabreaking

[breaking_news]

electoral roll :मतदार यादीत नाव नसलेल्यांसाठी पुन्हा संधी! विशेष पुनरीक्षणात नाव नोंदणीचा मार्ग मोकळा

electoral roll : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान काही मतदारांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (ASDD – Absent, Shifted, Dead, Duplicate) या कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकलेली नाहीत. अशा मतदारांना आपले नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी निवडणूक विभागाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे.

electoral roll

मतदार यादीतून नाव वगळले गेले? चिंता नको! गणना प्रपत्र भरून पुन्हा नोंदणी करा

बुलढाणा : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान काही मतदारांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (ASDD – Absent, Shifted, Dead, Duplicate) या कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकलेली नाहीत. अशा मतदारांना आपले नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी निवडणूक विभागाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे.

add

संबंधित मतदारांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणी संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे गणना प्रपत्र भरून सादर करता येणार आहे. यापूर्वी गणना प्रपत्र भरलेल्या मतदारांची माहिती ECINET प्रणालीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या माध्यमातून संबंधित मतदारांपर्यंत प्रत्यक्ष भेट, व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा एसएमएसद्वारे गणना प्रपत्र पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

याशिवाय, मतदार संकेतस्थळ किंवा ECINET ॲपच्या माध्यमातून मतदारांना आपला EPIC क्रमांक प्रविष्ट करून गणना प्रपत्र डाउनलोड करता येणार असून, ते भरून सादर करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या (BLA) समन्वयाने संबंधित मतदारांशी संपर्क साधणार आहेत. तसेच मतदारांचे नातेवाईक, शेजारी, स्थानिक रहिवासी कल्याणकारी संस्था आणि उपलब्ध संपर्क क्रमांकांच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात येणार आहे.

मूळ निवासस्थानावरून स्थलांतरित न झालेल्या मतदारांनी गणना प्रपत्रासोबत जोडपत्र-बमध्ये यापूर्वी गणना प्रपत्र सादर करता आले नसल्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहे. तर स्थलांतरित झालेल्या मतदारांनी जोडपत्र-कमध्ये आपला नवीन पत्ता आणि विधानसभा मतदारसंघाची माहिती नमूद करून सध्याच्या निवासस्थानाशी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ASDD मतदारांची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या मतदारांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करायचे आहे, त्यांनी नमुना अर्ज क्रमांक ६ (फॉर्म-६) भरून ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. यासाठी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

दरम्यान, ASDD यादीत समाविष्ट असलेल्या ज्या मतदारांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म-६ भरला आहे, त्यांना पुन्हा गणना प्रपत्र भरण्याची आवश्यकता नाही, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे आणि नाव समाविष्ट नसल्यास आवश्यक ती कार्यवाही करून मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top