Mahabreaking

[breaking_news]

illegal moneylenders: अवैध सावकारांच्या मुसक्या आवळण्यास सहकार विभाग सरसावला! बुलढाण्यात धाड; कोरे चेक, करारनाम्यांसह महत्त्वाची कागदपत्रे जप्त

illegal moneylenders: सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणीचा फायदा घेत अवैध सावकारीच्या जाळ्यात ओढणाऱ्यांविरोधात आता सहकार विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुलढाणा शहरातील सुंदरखेड परिसरात अवैध सावकारीच्या तक्रारीवरून सहकार विभागाच्या विशेष पथकाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी धडक झडती कारवाई केली. या कारवाईत कोरे चेक, पैशांच्या व्यवहारासंबंधीचे करारनामे, व्यवहारांच्या नोंदवह्या आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.

illegal

 अवैध सावकारीचा बाजार उघड होणार? बुलढाण्यात सहकार विभागाची धडक कारवाई; संशयित व्यवहारांची कागदपत्रे ताब्यात

बुलढाणा : सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणीचा फायदा घेत अवैध सावकारीच्या जाळ्यात ओढणाऱ्यांविरोधात आता सहकार विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुलढाणा शहरातील सुंदरखेड परिसरात अवैध सावकारीच्या तक्रारीवरून सहकार विभागाच्या विशेष पथकाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी धडक झडती कारवाई केली. या कारवाईत कोरे चेक, पैशांच्या व्यवहारासंबंधीचे करारनामे, व्यवहारांच्या नोंदवह्या आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.

add

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ मधील कलम १६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. सुंदरखेड येथील सम्यक नगर परिसरातील सौ. दीक्षा शशिकांत गवई यांनी मौळी पार्क, खामगाव रोड, सुंदरखेड येथील रेखा मनोज पवार यांच्याविरुद्ध अवैध सावकारीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली.

add

विशेष पथकाची धडक; संशयास्पद कागदपत्रे ताब्यात

या विशेष पथकाचे नेतृत्व सहायक निबंधक (प्रशासन) स्वरूपा धुमाळ यांनी केले. पथकामध्ये सहकार अधिकारी यु. के. सुरडकर, योगेश धुसळकर, के. डी. शोलके, ए. ए. बारी, निलेश सोनुने आणि अक्षय परिहार यांचा समावेश होता.

पथकाने संबंधित ठिकाणी झडती घेतली असता कोरे चेक, आर्थिक व्यवहारांचे करारनामे, व्यवहारांच्या नोंदवह्या आणि अवैध सावकारीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आढळून आली. ही सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, त्यांची सखोल तपासणी सुरू आहे. या दस्तऐवजांच्या तपासणीतून आर्थिक व्यवहारांचे स्वरूप आणि तक्रारीतील आरोपांबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

प्रशासन आणि पोलिसांची संयुक्त उपस्थिती

जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी, बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अवैध सावकारी दिसताच तक्रार करा; सहकार विभागाचे आवाहन

अवैध सावकारीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळाले आहेत. जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले की, जिल्ह्यात कुठेही अवैध सावकारीचा प्रकार आढळल्यास नागरिकांनी भीती न बाळगता सहकार विभागाकडे लेखी तक्रार दाखल करावी. तक्रारींची दखल घेऊन नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top