Mahabreaking

[breaking_news]

loan waivers :५५ लाख शेतकरी कर्जमाफीस पात्र, प्रत्यक्ष लाभ मात्र १२ लाखांनाच! रोहित पवारांचा सरकारला सवाल

loan waivers : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या घोषणेनंतरही प्रत्यक्ष लाभ मिळण्याबाबत विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, महाराष्ट्रात कर्जमाफीसाठी ५५ लाख शेतकरी पात्र असताना आतापर्यंत केवळ २४ लाख शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यापैकीही फक्त १२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. हा शासनाचा नाकर्तेपणा नव्हे तर काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.

loan waivers

  रात्री ११ वाजता रोहित पवार पोहोचले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या दारी; कर्जमाफीवरून सरकारला घेरले!

अशोक इंगळे

सिंदखेडराजा : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या घोषणेनंतरही प्रत्यक्ष लाभ मिळण्याबाबत विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, महाराष्ट्रात कर्जमाफीसाठी ५५ लाख शेतकरी पात्र असताना आतापर्यंत केवळ २४ लाख शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यापैकीही फक्त १२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. हा शासनाचा नाकर्तेपणा नव्हे तर काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.

४ नोव्हेंबर रोजी आमदार रोहित पवार यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा, बामखेड आणि रताळी येथे भेट देऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासनाकडून मिळणारी मदत, तिच्या प्रक्रियेतील अडथळे आणि विलंब याबाबत त्यांनी माहिती घेतली. शासकीय मदत मिळवून देताना कोणताही अधिकारी अडवणूक करीत असेल, तर थेट माझ्याशी संपर्क साधा. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारू, अशी ग्वाही त्यांनी कुटुंबीयांना दिली.

रताळी येथील शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या प्रश्नावर आमदार पवार यांचे लक्ष वेधले. गावातील केवळ ७० शेतकऱ्यांचीच नावे कर्जमाफीच्या यादीत जाहीर झाली असून, उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार आणि त्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावर बोलताना आमदार पवार यांनी कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील विलंबावर शासनाला धारेवर धरले.

दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी रताळी येथील आकाश बळीराम पाटील (वय २४) या शेतकरी पुत्राने शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आमदार रोहित पवार यांनी बळीराम पाटील यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. या कुटुंबाला शासनाकडून आजपर्यंत कोणती मदत मिळाली, मदत मिळण्यास विलंब का झाला, याची आपण जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची गरज आहे. आत्महत्या करून प्रश्न सुटत नाहीत. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळते. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शासनासह समाजानेही मदतीचा हात देण्याची गरज आहे. राज्यभरातील अशा कुटुंबीयांच्या भेटीदरम्यान अनेक गंभीर वास्तव समोर येत असल्याचेही आमदार पवार यांनी नमूद केले.

साखरखेर्डा येथील संतोष खरात आणि गोविंदराव बेंडमाळी यांनीही आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आमदार पवार यांनी आस्थेने विचारपूस केली आणि सांत्वन केले. विशेष म्हणजे, साखरखेर्डा गावात भेटी देण्यासाठी जाताना त्यांनी थेट सरपंच अमित जाधव यांच्या मोटारसायकलवरून प्रवास केला. रात्री अकरा वाजेपर्यंत त्यांनी विविध कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या.

दरम्यान, जिल्ह्यात आठ आमदार, खासदार, मंत्री आणि माजी मंत्री असतानाही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या भेटीसाठी कोणीही लोकप्रतिनिधी आले नसल्याची चर्चा यावेळी उपस्थित शेतकऱ्यांमध्ये होती. शरद पवार यांच्यानंतर लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याची हातोटी रोहित पवार यांच्यात असल्याची प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, प्रेसंजित पाटील, सिंदखेडराजा विधानसभा संपर्कप्रमुख सतीश काळे, माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, माजी सभापती राजू ठोके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमेश शेजूळ, माजी सभापती अनिल तुपकर, अमित जाधव, माजी सरपंच कमलाकर गवई, उपसरपंच तथा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद रफीक, योगेश नाईक, डॉ. ज्योतीताई खेडेकर, आदित्य काटे, दिलीप खंडारे, आयुब कुरेशी, दिलीप बेंडमाळी, श्रीकांत पऱ्हाड, शुभम राजपूत, वामन नाईक, रमेश नन्हई, ज्ञानेश्वर मुदमाळी, माधव नाईक, गणपत अवचार, भानुदास लव्हाळे, माजी सरपंच सौ. अलका लव्हाळे, सरपंच उषा पाटील, समाधान पाटील, दिलीप सोभागे यांच्यासह शेकडो शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top