Mahabreaking

[breaking_news]

Farmer abducted :विश्वी शिवारात शेतकऱ्याचे दिवसाढवळ्या अपहरण; आठ तास डांबून ठेवत बेदम मारहाण!

Farmer abducted : डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विश्वी येथील शेतशिवारात एका ५० वर्षीय शेतकऱ्याचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्याला तब्बल आठ तास अज्ञात ठिकाणी डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या काळात संबंधित शेतकऱ्याला मारहाणही करण्यात आली. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी ३ नोव्हेंबर रोजी डोणगाव पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Farmer

  शेतात एकटे असलेल्या ५० वर्षीय शेतकऱ्याला गाठले; आठ तासांच्या छळानंतर रात्री सोडले!

डोणगाव : डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विश्वी येथील शेतशिवारात एका ५० वर्षीय शेतकऱ्याचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्याला तब्बल आठ तास अज्ञात ठिकाणी डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या काळात संबंधित शेतकऱ्याला मारहाणही करण्यात आली. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी ३ नोव्हेंबर रोजी डोणगाव पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल नामदेवराव शेवाळे (वय ५०, रा. विश्वी) हे ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात एकटेच असताना आरोपी दिलीप देशमुख (रा. विश्वी) आणि इतर तीन अनोळखी इसमांनी नियोजनपूर्वक तेथे धाव घेतली. त्यानंतर आरोपींनी शेवाळे यांना जबरदस्तीने वाहनात कोंबून त्यांच्या इच्छेविरुद्ध अज्ञात ठिकाणी नेले.

अज्ञात ठिकाणी नेल्यानंतर आरोपींनी त्यांना मारहाण करत तब्बल आठ तास बेकायदेशीररीत्या डांबून ठेवले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी त्यांना पुन्हा मूळ ठिकाणी आणून सोडून दिले.

या घटनेनंतर फिर्यादी अनिल शेवाळे यांच्या तोंडी तक्रारीवरून डोणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले करीत आहेत.

शेतात एकटे असलेल्या शेतकऱ्याचे भरदिवसा अपहरण करून आठ तास डांबून ठेवत मारहाण केल्याच्या या घटनेमुळे विश्वी गावासह परिसरात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top