Mahabreaking

[breaking_news]

  35 tonnes of rice :एफसीआयच्या नावाखाली ३५ टन तांदळाची संशयास्पद वाहतूक! औरंगाबाद ते नागपूर कनेक्शन उघड होण्याची शक्यता

35 tonnes of rice : येथील तांदूळ जप्ती प्रकरणात पोलीस आणि पुरवठा विभागाने सलग तीन दिवस केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर मोठी कारवाई केली आहे. २७ ऑक्टोबर रोजी सिंदखेड ते बार्शीटाकळी मार्गावर नाकाबंदीदरम्यान पकडण्यात आलेला ३५ टन तांदूळ वाहतूक करणारा ट्रक ३० ऑक्टोबर रोजी जप्त करण्यात आला. तसेच या प्रकरणी दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ३१ ऑक्टोबर रोजी ट्रकसह जप्त केलेल्या तांदळाचे वजन करून पुरवठा विभागाने तो ताब्यात घेतला. हा तांदूळ तहसील कार्यालय परिसरातील शासकीय धान्य गोदामात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

rice

 प्लास्टिकच्या पोत्यांत एफसीआयचा तांदूळ? बार्शीटाकळीत ३५ टनांचा ट्रक जप्त; दोघांवर गुन्हा

बबन इंगळे

बार्शीटाकळी : येथील तांदूळ जप्ती प्रकरणात पोलीस आणि पुरवठा विभागाने सलग तीन दिवस केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर मोठी कारवाई केली आहे. २७ ऑक्टोबर रोजी सिंदखेड ते बार्शीटाकळी मार्गावर नाकाबंदीदरम्यान पकडण्यात आलेला ३५ टन तांदूळ वाहतूक करणारा ट्रक ३० ऑक्टोबर रोजी जप्त करण्यात आला. तसेच या प्रकरणी दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ३१ ऑक्टोबर रोजी ट्रकसह जप्त केलेल्या तांदळाचे वजन करून पुरवठा विभागाने तो ताब्यात घेतला. हा तांदूळ तहसील कार्यालय परिसरातील शासकीय धान्य गोदामात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

औरंगाबाद ते नागपूर कनेक्शन संशयाच्या भोवऱ्यात!

जप्त करण्यात आलेला तांदळाचा साठा नेमका कोठून आणि कसा आला, याची चौकशी करण्यासाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद गुप्ता यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कागदपत्रे, खरेदी-विक्री परवाने आणि अन्य दस्तऐवजांची पडताळणी केली. या तपासादरम्यान अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत.

सुरेश ट्रेडर्स, कोंढाळी (नागपूर) येथील सुरेश गांधी यांच्या प्रतिनिधीमार्फत संबंधित ट्रकमधील तांदूळ भारतीय अन्न महामंडळाकडून (एफसीआय) खरेदी केल्याचे सांगण्यात आले. मात्र, या तांदळाची वाहतूक एफसीआयच्या बारदान्याऐवजी प्लास्टिकच्या पोत्यांमधून केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या व्यवहाराबाबत संशय निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, संबंधित ट्रक औरंगाबादहून नागपूरकडे रवाना झाल्याचे सांगितले जात असताना, तो प्रमुख मार्ग सोडून छुप्या मार्गाने जात असल्याची बाबही तपासात समोर आली आहे. आणखी गंभीर बाब म्हणजे, ज्या ट्रेडर्सने भारतीय अन्न महामंडळाकडून तांदूळ खरेदी केल्याचा दावा केला, त्या ट्रेडर्सकडे धान्य खरेदी-विक्रीचा परवाना नसून केवळ तेलबिया, डाळ आणि डाळबिया खरेदी-विक्रीचा परवाना असल्याची माहिती समोर आली आहे.

या सर्व बाबींचा विचार करता, तांदळाच्या वाहतुकीचे धागेदोरे औरंगाबाद आणि नागपूरपर्यंत पोहोचत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास झाल्यास अवैध धान्य खरेदी-विक्री करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस आणि पुरवठा विभागाने या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन संपूर्ण साखळीचा छडा लावण्याची गरज आहे.

पोलीस आणि पुरवठा विभागाकडून तपास सुरू

या तांदूळ जप्ती प्रकरणाचा तपास पोलीस विभागाच्या वतीने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आनंद कांदे करीत आहेत. तर महसूल विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद गुप्ता तपास करीत आहेत.

या कारवाईमुळे एफसीआयच्या नावाखाली होणाऱ्या धान्य व्यवहारांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तपासातून या संशयास्पद वाहतुकीमागील नेमके सत्य काय आहे, हे स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top