Mahabreaking

[breaking_news]

Assault with a stick :गिरोली बु. येथे नातेवाइकांचा राडा! काठीने मारहाण, पत्नीला चापटाबुक्क्यांचा प्रसाद; कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

Assault with a stick : पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, या कारणावरून नातेवाइकांमध्ये वाद उफाळून आल्याची घटना तालुक्यातील गिरोली बु. येथे ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. या वादातून एका महिलेसह अन्य दोघांनी मिळून फिर्यादीला काठीने मारहाण करून जखमी केले, तसेच त्यांच्या पत्नीला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर फिर्यादीसह त्यांच्या आई व मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दोन महिला व एका अनोळखी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Assault
पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग; भावजय-पुतणीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

गजानन तिडके
देऊळगाव राजा : पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, या कारणावरून नातेवाइकांमध्ये वाद उफाळून आल्याची घटना तालुक्यातील गिरोली बु. येथे ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. या वादातून एका महिलेसह अन्य दोघांनी मिळून फिर्यादीला काठीने मारहाण करून जखमी केले, तसेच त्यांच्या पत्नीला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर फिर्यादीसह त्यांच्या आई व मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दोन महिला व एका अनोळखी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल मार्तंड अंभोरे (वय ३६, रा. गिरोली बु., ता. देऊळगाव राजा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. यापूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, या कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला.
३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास फिर्यादीची भावजय गीता गणेश अंभोरे हिने हातातील काठीने फिर्यादीच्या पाठीवर तसेच दोन्ही दंडांवर मारहाण करून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यावेळी फिर्यादीची पुतणी गायत्री गणेश अंभोरे आणि तिच्यासोबत आलेल्या एका अनोळखी तरुणानेही वादात हस्तक्षेप केला. या दोघांनी फिर्यादीला डोळ्यांत मिरचीपूड टाकून काटा काढण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याचवेळी गीता अंभोरे व गायत्री अंभोरे यांनी फिर्यादीची पत्नी सरला अमोल अंभोरे हिलाही चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीची आई आणि मुलांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दोघींसह अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी फिर्यादीने दिलेली तक्रार आणि वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम अप क्रमांक ४९१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३० ऑक्टोबर रोजी रात्री ९.४१ वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय गोरे करीत आहेत. नातेवाइकांमधील वादातून घडलेल्या या घटनेमुळे गिरोली बु. परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top