Madhav Tidke: अखिल भारतीय माळी महासंघाच्या देऊळगाव राजा तालुका कर्मचारी आघाडीच्या अध्यक्षपदी माधव पांडुरंग तिडके यांची निवड करण्यात आली आहे. महासंघाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने ही निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे तिडके यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांच्या निवडीचे समाजबांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे.

माधव तिडके यांच्यावर माळी महासंघाची महत्त्वपूर्ण जबाबदारी; मान्यवरांकडून अभिनंदन
गजानन तिडके
देऊळगाव राजा : अखिल भारतीय माळी महासंघाच्या देऊळगाव राजा तालुका कर्मचारी आघाडीच्या अध्यक्षपदी माधव पांडुरंग तिडके यांची निवड करण्यात आली आहे. महासंघाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने ही निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे तिडके यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांच्या निवडीचे समाजबांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे.
माधव तिडके हे देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड भुई येथील रहिवासी असून, शिंदे हॉस्पिटलजवळ, सावखेड भुई रोड येथे त्यांचे वास्तव्य आहे. अखिल भारतीय माळी महासंघाच्या कर्मचारी आघाडीच्या माध्यमातून कर्मचारी वर्गाचे प्रश्न मांडणे, संघटनात्मक कार्याला चालना देणे आणि समाजातील विविध घटकांना संघटित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.
मान्यवरांच्या सहमतीने निवड
महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कर्मचारी आघाडीचे पदाधिकारी शंकरराव आसाराम झोरे, देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष काशिनाथ ऊर्फ प्रकाश खांडेभराड, बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय राजाभाऊ खरात, जिल्हा उपाध्यक्ष नंदू जनार्दन वाघमारे, तालुका उपाध्यक्ष देवराव मैनाजी पारेकर, तालुका सचिव पांडुरंग किसनराव वाघ, तालुका संघटक संतोष जगन्नाथ जाधव, जिल्हा सरचिटणीस प्रा. दीपक नन्हई, प्रदेश संघटक जनाबापू मेहेत्रे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश द. मेहेत्रे, सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष नरहरी मंजाजी तायडे आणि तालुका उपाध्यक्ष सखाराम बाबूराव हरकळ यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने ही निवड करण्यात आली.
राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन
माधव तिडके यांच्या निवडीबद्दल महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे, विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेशभाऊ हिरळकार, प्रदेशाध्यक्ष गौतमजी क्षिरसागर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अभय तायडे, प्रदेश संघटक डॉ. गजाननजी अजगर, कर्मचारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष केशवराव सोनुने, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मधुकरराव घिरके आणि जिल्हाध्यक्ष व विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
याशिवाय वासुदेव राजनकर, गणेशजी हरकळ, पुरुषोत्तम हरिभाऊ खरात, शाहीर हरीदासजी खांडेभराड, बबनराव धोंडीबा खरात, विनायक पुरुषोत्तम जाधव, विष्णुभाऊ इंगळे, भानुदासजी अजगर, सत्यशोधक युवा शाहीर सतीश कुरंगळ, डॉ. संजयजी कानकटाव, सुरेंद्र चौधरी, गजाननजी खंडारे, डॉ. मल्हारी किसन नन्हई, रामेश्वर जावळे, गजानन बांडे, दत्तात्रय आनंदराव झोरे, प्रकाश मुकिंदराव मोरे, सत्यशोधक शाहीर रामदास कुरंगळ, राजेंद्र पवार, जनार्दन सपकाळ, अमोलजी मगर, रामभाऊ किसन अवचार, सुभाष शंकर हरकळ, दीपक मुरलीधर झोरे आणि ज्ञानेश्वर संतोष माने यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी तिडके यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अखिल भारतीय माळी महासंघाच्या कर्मचारी आघाडीच्या माध्यमातून कर्मचारी वर्गाचे प्रश्न सोडविणे, समाजहिताचे उपक्रम राबविणे आणि संघटनेची ताकद वाढविणे यासाठी माधव तिडके प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा त्यांच्या निवडीनिमित्त व्यक्त करण्यात येत आहे.

