Mahabreaking

[breaking_news]

woman met an unfortunate end:  काळाने घात केला! साडीचा पदर चाकात अडकला; ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत

woman met an unfortunate end: पतीसोबत दुचाकीवरून प्रवास करताना सुखरूप घरी परतण्याची आशा मनात असतानाच एका दुर्दैवी घटनेने ४५ वर्षीय महिलेचा जीव घेतला. चालत्या दुचाकीच्या मागील चाकात साडीचा पदर अडकला आणि तो गळ्याला ओढला गेल्याने महिला दुचाकीवरून खाली पडल्या. डोक्याला गंभीर दुखापत होऊन झालेल्या रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वाडेगाव-अकोला मार्गावरील संत गजानन महाराज मंदिराजवळ, गोरेगाव परिसरात घडली. या घटनेमुळे वाडेगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.

woman

 पतीसोबतचा प्रवास ठरला अखेरचा! साडीचा पदर गळ्याला अडकून महिलेचा मृत्यू

राहुल सोनोने

वाडेगाव : पतीसोबत दुचाकीवरून प्रवास करताना सुखरूप घरी परतण्याची आशा मनात असतानाच एका दुर्दैवी घटनेने ४५ वर्षीय महिलेचा जीव घेतला. चालत्या दुचाकीच्या मागील चाकात साडीचा पदर अडकला आणि तो गळ्याला ओढला गेल्याने महिला दुचाकीवरून खाली पडल्या. डोक्याला गंभीर दुखापत होऊन झालेल्या रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वाडेगाव-अकोला मार्गावरील संत गजानन महाराज मंदिराजवळ, गोरेगाव परिसरात घडली. या घटनेमुळे वाडेगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाडेगाव येथील संजय भुस्कुटे हे पत्नी मंजुषा संजय भुस्कुटे (वय ४५) यांच्यासह दुचाकीने काही कामानिमित्त अकोल्याकडे जात होते. मंजुषा या दुचाकीच्या मागील सीटवर बसल्या होत्या. प्रवास सुरू असतानाच अचानक त्यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागील चाकात अडकला. पदर गळ्याला ओढला गेल्याने त्यांचा तोल गेला आणि त्या दुचाकीवरून खाली पडल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेचे गांभीर्य लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यानंतर त्यांना सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. काही क्षणांपूर्वी सुरू असलेला प्रवास एका भीषण अपघातामुळे मृत्यूच्या दुर्दैवी वळणावर येऊन थांबला.

मंजुषा भुस्कुटे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पतीसोबत प्रवास करत असताना घडलेल्या या अनपेक्षित घटनेने परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करीत आहेत. एका क्षणाच्या दुर्घटनेने कुटुंबातील व्यक्ती हिरावून नेल्याने या घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे.

मंजुषा भुस्कुटे यांच्यावर रविवार, २५ ऑक्टोबर रोजी वाडेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दुचाकी प्रवासात साडीच्या पदराची काळजी घ्या!

दुचाकीवर मागे बसताना साडीचा पदर, ओढणी किंवा इतर सैल कपडे चाकात अडकणार नाहीत याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. छोट्याशा निष्काळजीपणातून गंभीर अपघात घडू शकतो, याची जाणीव करून देणारी ही घटना आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top