Mahabreaking

[breaking_news]

Congress: विमुक्त-भटक्या समाजाच्या प्रश्नांवर काँग्रेसचा एल्गार! अकोल्यात शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक

Congress: विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील समाजाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन त्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अकोला जिल्हा काँग्रेसच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) विभागाची आढावा बैठक शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १२.३० वाजता अकोला बसस्थानकासमोरील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ‘स्वराज्य भवन’ कार्यालयात ही बैठक होणार आहे.

Congress

  VJNT समाजाच्या प्रश्नांवर खल; ॲड. पल्लवीताई रेणके अकोल्यात करणार मार्गदर्शन

बाळापूर : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील समाजाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन त्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अकोला जिल्हा काँग्रेसच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) विभागाची आढावा बैठक शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १२.३० वाजता अकोला बसस्थानकासमोरील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ‘स्वराज्य भवन’ कार्यालयात ही बैठक होणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या VJNT विभागाच्या अध्यक्ष ॲड. पल्लवीताई रेणके या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील समाजाची सद्यस्थिती, त्यांच्यासमोरील विविध समस्या, सामाजिक-राजकीय वास्तव आणि समाजाच्या हक्कांचे प्रश्न या विषयांवर त्या मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे जिल्ह्यातील VJNT समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

या बैठकीला अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाशभाऊ तायडे, अकोला महानगर काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र गवई, अकोला पश्चिमचे आमदार साजिदभाई पठाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या VJNT विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बादल गायकवाड, महेशभाऊ गणगणे यांच्यासह काँग्रेसचे विविध जिल्हा व प्रदेशस्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

समाजाच्या प्रश्नांवर होणार विचारमंथन

विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाला भेडसावणाऱ्या समस्या, त्यांच्या हक्कांचे प्रश्न, सामाजिक व आर्थिक परिस्थिती तसेच संघटनात्मक बळकटीकरण या विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. समाजाच्या विविध मागण्या प्रभावीपणे मांडण्यासाठी पुढील काळात कोणती भूमिका घ्यावी आणि संघटनात्मक पातळीवर कोणती दिशा निश्चित करावी, यावरही विचारमंथन होणार आहे.

या बैठकीच्या माध्यमातून विमुक्त-भटक्या समाजाच्या प्रश्नांना राजकीय व्यासपीठावर कितपत प्रभावीपणे मांडले जाते आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेसकडून कोणती पुढील पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top