Mahabreaking

[breaking_news]

  Lata Mandapotsav: ‘लक्ष्मी रमण गोविंदा’च्या जयघोषात देऊळगाव राजाचा लाटामंडपोत्सव उत्साहात संपन्न

Lata Mandapotsav: प्रतितिरुपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराजांचा वैशिष्ट्यपूर्ण लाटामंडपोत्सव ‘बोल बालासाहेब की जय’, ‘लक्ष्मी रमण गोविंदा’ आणि ‘गोविंदा गोविंदा’च्या जयघोषात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मंदिरातील घंटानाद, प्रवेशद्वारावरील नगाऱ्यांचा गजर आणि भाविकांच्या जयघोषाने श्री बालाजी मंदिर परिसर भक्तिमय झाला. अवघ्या महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण मानल्या जाणाऱ्या या सोहळ्याने उपस्थित भाविकांचे डोळे अक्षरशः दीपवले.

Lata Mandapotsav

  २१ महाकाय सागवानी लाटांची उभारणी; प्रतितिरुपतीच्या लाटामंडपोत्सवाने भाविकांचे डोळे दीपले

गजानन तिडके

देऊळगाव राजा : प्रतितिरुपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराजांचा वैशिष्ट्यपूर्ण लाटामंडपोत्सव ‘बोल बालासाहेब की जय’, ‘लक्ष्मी रमण गोविंदा’ आणि ‘गोविंदा गोविंदा’च्या जयघोषात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मंदिरातील घंटानाद, प्रवेशद्वारावरील नगाऱ्यांचा गजर आणि भाविकांच्या जयघोषाने श्री बालाजी मंदिर परिसर भक्तिमय झाला. अवघ्या महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण मानल्या जाणाऱ्या या सोहळ्याने उपस्थित भाविकांचे डोळे अक्षरशः दीपवले.

Lata Mandapotsav

आश्विन शुद्ध अष्टमी व नवमीच्या पर्वावर सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी सुरू झालेला लाटामंडपोत्सव मानकरी आणि भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. या पारंपरिक उत्सवासाठी मानकरी व समाजबांधवांनी एकत्र येत धार्मिक परंपरेचे जतन केले.

Lata Mandapotsav

४२ मंडपांना दोर बांधून २१ महाकाय लाटांची उभारणी

लाटामंडपोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या २१ महाकाय सागवानी लाटांची उभारणी करण्यात आली. सुमारे दीड फूट व्यास आणि ३२ फूट उंचीच्या या लाटामंडपासाठी ४२ मंडपांना दोर बांधण्यात आले. महाद्वाराशेजारी असलेल्या हनुमानाच्या प्राचीन दगडी मूर्तीला आणि संस्थानासमोरील गरुडाच्या दगडी मूर्तीला हा अखंड दोर बांधून भव्य लाटामंडप उभारण्यात आला.

पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या कामात मानकरी आणि विविध समाजबांधवांनी सहकार्य केले. लाटामंडपाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर श्री बालाजी संस्थानच्या वतीने सर्व मानकऱ्यांना प्रसाद वितरित करण्यात आला.

दसऱ्याच्या मध्यरात्री पालखी मिरवणूक

श्री बालाजी संस्थानने जाहीर केलेल्या नियोजनानुसार, आश्विन शुद्ध नवमी-दशमीच्या पर्वावर मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मध्यरात्री १२ वाजता श्रींची पालखी मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी आश्विन शुद्ध दशमीला श्रींची पालखी संपूर्ण शहरातून प्रदक्षिणा घालून पुन्हा मंदिरात विराजमान होईल.

तसेच आश्विन कृष्ण चतुर्थी, गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी लळित उत्सव संपन्न होणार आहे. या उत्सवांमुळे देऊळगाव राजा शहरात भक्तिमय वातावरण राहणार असून, भाविकांना श्री बालाजी महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

कानगी व अन्नदान देणगीसाठी स्वतंत्र QR कोड

भाविकांना सहजतेने कानगी तसेच शाश्वत अन्नदानासाठी देणगी देता यावी, यासाठी श्री बालाजी संस्थानच्या वतीने स्वतंत्र क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या क्यूआर कोडचा वापर करून भाविकांना देणगी जमा करता येणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली.

भाविकांना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन

श्री बालाजी महाराजांच्या उत्सवात सर्व भाविकांनी सहभागी होऊन दर्शन, प्रसाद आणि यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव आणि व्यवस्थापक किशोर बीडकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top