Mahabreaking

[breaking_news]

Excess charges: बुलढाणा बसस्थानकावर NCMC कार्डच्या नावाखाली अतिरिक्त वसुली; सुरक्षा दक्षता अधिकारी जयंत कांडेलकर यांचा दणका!

Excess charges: राज्यात दुष्काळाचे सावट असताना सर्वसामान्य प्रवाशांकडून निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम वसूल करण्याचा प्रकार बुलढाणा बसस्थानकावर उघडकीस आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या (NCMC) नोंदणीसाठी १९९ रुपये शुल्क निर्धारित असताना एका महिला प्रवाशाकडून २५० रुपये आकारण्यात आल्याचे सुरक्षा व दक्षता विभागाच्या पडताळणीत निष्पन्न झाले. या प्रकरणी संबंधित कंपनी प्रतिनिधीविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यासाठी अहवाल सादर करण्यात आला आहे.

Excess

 १९९ रुपयांचे कार्ड २५० रुपयांना! महिला प्रवाशाकडून ५१ रुपये जादा वसुली; एसटी महामंडळाकडून कारवाईचा अहवाल

बुलढाणा  : राज्यात दुष्काळाचे सावट असताना सर्वसामान्य प्रवाशांकडून निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम वसूल करण्याचा प्रकार बुलढाणा बसस्थानकावर उघडकीस आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या (NCMC) नोंदणीसाठी १९९ रुपये शुल्क निर्धारित असताना एका महिला प्रवाशाकडून २५० रुपये आकारण्यात आल्याचे सुरक्षा व दक्षता विभागाच्या पडताळणीत निष्पन्न झाले. या प्रकरणी संबंधित कंपनी प्रतिनिधीविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यासाठी अहवाल सादर करण्यात आला आहे.

गोपनीय पडताळणीत अतिरिक्त वसुली उघड

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे. या कार्डच्या नोंदणी व वितरणासाठी मे. ईबिक्स टेक्नॉलॉजीज कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्ड नोंदणीसाठी १९९ रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारू नये, अशा सूचना असतानाही बुलढाणा बसस्थानकावर प्रवाशांकडून अतिरिक्त रक्कम घेतली जात असल्याची माहिती सुरक्षा व दक्षता विभागाला मिळाली होती.

या माहितीची खातरजमा करण्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडेलकर, सुरक्षा निरीक्षक छगन ते. बाहेकर आणि सहाय्यक सुरक्षा निरीक्षक (प्रशिक्षणार्थी) परेश श. चिंचोरे यांनी बसस्थानकावर जाऊन पडताळणी केली.

यावेळी गोपनीय पद्धतीने एका महिला प्रवाशामार्फत कार्ड नोंदणीची प्रक्रिया करून घेण्यात आली. त्यावेळी संबंधित कंपनी प्रतिनिधीने निर्धारित १९९ रुपयांऐवजी २५० रुपये आकारल्याचे आढळले. म्हणजेच एका प्रवाशाकडून ५१ रुपये अतिरिक्त वसूल करण्यात आल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले.

कंपनी प्रतिनिधीने अतिरिक्त रक्कम घेतल्याचे मान्य केल्याची माहिती

या प्रकरणात संबंधित महिला प्रवाशाचा जबाब नोंदविण्यात आला. तसेच मे. ईबिक्स टेक्नॉलॉजीज कंपनीचे प्रतिनिधी अक्षय मंगल जाधव यांनीही प्रवाशांकडून २५० रुपये घेतल्याचे मान्य केल्याची माहिती समोर आली आहे.

निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारल्याप्रकरणी संबंधित प्रतिनिधीला जबाबदार धरण्यात आले आहे. सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडेलकर यांनी पुढील प्रशासकीय कारवाईसाठी अहवाल विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बुलढाणा विभाग यांच्याकडे सादर केला आहे.

प्रवाशांनी अतिरिक्त शुल्क आकारल्यास तक्रार करावी

सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या कार्डच्या नोंदणी प्रक्रियेत निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्यास प्रवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

सवलतीचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणेने लक्ष देणे आवश्यक आहे. बुलढाणा बसस्थानकावरील या प्रकारानंतर संबंधित प्रतिनिधीविरुद्ध पुढे कोणती प्रशासकीय कारवाई होते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top