Mahabreaking

[breaking_news]

Bhaskarraoji Shingne Saheb: ‘सहकार महर्षी भास्कररावजी शिंगणे साहेब अमर रहे!’ घोषणांनी सिंदखेडराजा मतदारसंघ दुमदुमला

Bhaskarraoji Shingne Saheb: बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नेते सहकार महर्षी स्व. भास्कररावजी शिंगणे यांच्या ३४ व्या स्मृतिमहोत्सवानिमित्त आयोजित स्मृतीज्योतीला सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये अभिवादन करण्यात आले. ‘सहकार महर्षी भास्कररावजी शिंगणे साहेब अमर रहे!’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. साखरखेर्डा नगरीतही शेकडो कार्यकर्त्यांनी स्मृतीज्योतीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

Bhaskarraoji

 ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतीज्योतीला अभिवादन; साखरखेर्ड्यात शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती

साखरखेर्डा : बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नेते सहकार महर्षी स्व. भास्कररावजी शिंगणे यांच्या ३४ व्या स्मृतिमहोत्सवानिमित्त आयोजित स्मृतीज्योतीला सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये अभिवादन करण्यात आले. ‘सहकार महर्षी भास्कररावजी शिंगणे साहेब अमर रहे!’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. साखरखेर्डा नगरीतही शेकडो कार्यकर्त्यांनी स्मृतीज्योतीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मस्थळी अभिवादन करून स्मृतीज्योतीच्या प्रवासाला प्रारंभ झाला. नगराध्यक्ष सौरभ तायडे आणि माजी सभापती शिवाजीराव जाधव यांनी सर्वप्रथम स्मृतीज्योतीचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर अनेक चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

मतदारसंघातील गावोगावी स्मृतीज्योतीचे स्वागत

सिंदखेडराजा येथून स्मृतीज्योत किनगावराजा, राहेरी बु., दुसरबीड, बीबी, मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा आणि शिंदी या गावांमध्ये नेण्यात आली. प्रत्येक ठिकाणी स्थानिक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्मृतीज्योतीला पुष्पहार अर्पण करून सहकार महर्षींच्या स्मृतींना उजाळा दिला.

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, माजी सभापती नाथाभाऊ दराडे, जगन मामा सहाने, माजी सभापती राजू ठोके, साहेबराव काटे महाराज, माजी सभापती अनिल तुपकर, माजी सरपंच कमलाकर गवई, माजी सरपंच दाऊद कुरेशी, संतोषराव शिंगणे, नंदकिशोर शिंगणे, अशोक रिंढे, जिजामाता विद्यालयाचे संचालक बबनराव रिंढे, अनिकेत सैनिक स्कूलचे अध्यक्ष अर्जुन गवई, गणपत अवचार, ललित अग्रवाल, सैय्यद रफीक, इब्राहिम शहा, रामदाससिंग राजपूत, ज्ञानेश्वर मुदमाळी, माजी सरपंच सुनील जगताप, अमित जाधव, शुभम राजपूत, राजेंद्र लोढे, आयुब कुरेशी, अशोक इंगळे, डी. एन. पांचाळ, वरोडीचे माजी उपसरपंच सुमेध गवई, माजी सभापती तेजराव बापू देशमुख, तोताराम ठोसरे, नितीन ठोसरे, ठाणेदार युवराज रबडे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे, अशोक गवई, रमेश ठोसरे, विजय काटे, नसिर दुकानदार, संजय पांचाळ, शेजूळ साहेब, बबन मुदमाळी, संतोष मंडळकर, माधव नाईक आणि कोंडूबा जाधव यांनी अभिवादन केले.

शिंदी येथेही मान्यवरांकडून श्रद्धांजली

शिंदी येथे जिजामाता विद्यालयाचे सचिव पंजाबराव हाडे, संतोष खरात, संस्थेचे संचालक विलास आबा रिंढे, भगवान बंगाळे आणि केशव बंगाळे यांनी स्मृतीज्योतीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विविध गावांतील नागरिक आणि कार्यकर्त्यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.

स्मृतीज्योत डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सुपूर्द

स्मृतीज्योतीच्या आयोजनासाठी गौतम खिल्लारे, अजीम नवाज राही आणि मनिष बोरकर यांनी पुढाकार घेतला. बुलढाणा येथे ही स्मृतीज्योत माजी मंत्री तथा बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सुपूर्द करण्यात आली. यावेळी स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी उपस्थित होते.

सहकार क्षेत्रातील योगदानामुळे ओळख निर्माण केलेल्या स्व. भास्कररावजी शिंगणे यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या उपक्रमातून त्यांच्या कार्याप्रती असलेली श्रद्धा आणि आदर व्यक्त करण्यात आला. स्मृतीज्योतीच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध गावांमध्ये एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी सहकार महर्षींच्या आठवणींना अभिवादन केले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top