Mahabreaking

[breaking_news]

six oxen kept: कत्तलीच्या उद्देशाने बांधलेले सहा बैल पोलिसांनी जप्त; दहीगाव गावंडे येथे मध्यरात्री छापा

six oxen kept: गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवलेल्या सहा बैलांना बोरगाव मंजू पोलिसांनी दहीगाव गावंडे येथे छापा टाकून जप्त केले. गुरुवार, ८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या सहा बैलांची अंदाजे किंमत १ लाख ७ हजार रुपये असून, या प्रकरणी दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमासह प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्यासंबंधीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

six oxen

  दहीगाव गावंडे येथे गोवंश कत्तलीचा संशय; १.०७ लाखांचे सहा बैल ताब्यात

बोरगाव मंजू : गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवलेल्या सहा बैलांना बोरगाव मंजू पोलिसांनी दहीगाव गावंडे येथे छापा टाकून जप्त केले. गुरुवार, ८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या सहा बैलांची अंदाजे किंमत १ लाख ७ हजार रुपये असून, या प्रकरणी दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमासह प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्यासंबंधीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात नाइट ऑफिसर म्हणून कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक मनोज भास्करराव उघडे यांना गोवंश कत्तलीसंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी दहीगाव गावंडे येथे छापा टाकला. यावेळी आरोपींच्या घरासमोरील गोठ्यात गोवंश जातीचे सहा बैल आढळून आले. हे बैल कत्तलीच्या उद्देशाने आखूड दोरीने निर्दयतेने बांधून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी संबंधित व्यक्तींकडे बैलांच्या संदर्भातील आवश्यक कागदपत्रांबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे दाखले नसल्याचे समोर आले. त्यानंतर पंचांसमक्ष सहाही बैल पोलिसांनी ताब्यात घेतले. जप्त केलेल्या गोवंशाची एकूण किंमत १ लाख ७ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी रावसाहेब ऊर्फ साहेबराव पंढरी खंडारे (वय ४७, रा. दहीगाव गावंडे, ता. जि. अकोला) आणि शेख अनझाद शेख गणी (रा. कसाबपुरा, बोरगाव मंजू) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजून ४३ मिनिटांनी नोंदविण्यात आला.

महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, सुधारित कायदा १९९५ मधील कलम ५(अ), ५(ब) व ९ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्यासंबंधीच्या अधिनियमातील कलम ११(१)(क) अन्वये ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल उमेश पुरी करीत आहेत. बोरगाव मंजू पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तलीसंदर्भातील हालचालींवर पोलिसांचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top