Mahabreaking

[breaking_news]

Devanand Mohod: युवकांच्या रोजगारासाठी योगदानाची दखल; देवानंद मोहोड यांना राज्यस्तरीय युवा गौरव

Devanand Mohod: उद्योग, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजातील तळागाळातील घटकांसह युवकांच्या विकासासाठी योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे अध्यक्ष देवानंद मोहोड यांना संत गाडगेबाबा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Devanand Mohod

सामाजिक कार्याची पोचपावती! देवानंद मोहोड यांना राज्यस्तरीय युवा पुरस्कार

बोरगाव मंजू : उद्योग, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजातील तळागाळातील घटकांसह युवकांच्या विकासासाठी योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे अध्यक्ष देवानंद मोहोड यांना संत गाडगेबाबा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक व सामाजिक कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात येतो. यावर्षी बोरगाव मंजू येथील देवानंद मोहोड यांच्या सामाजिक व उद्योजकीय कार्याची दखल घेण्यात आली.

युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी मोहोड यांनी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच समाजातील तळागाळातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचीही दखल घेण्यात आली.

एका विशेष कार्यक्रमात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते देवानंद मोहोड यांना प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

देवानंद मोहोड यांच्या कर्तृत्व, नेतृत्व, सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि विधायक दृष्टिकोनातून समाजहितासाठी सुरू असलेली वाटचाल प्रेरणादायी असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. त्यांच्या कार्यातून असंख्य युवकांना नवी दिशा व प्रेरणा मिळत असून, समाजहिताचे हे कार्य यापुढेही अखंड सुरू राहावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी व्यक्त केल्या.यावेळी गाडगेबाबा प्रतिष्ठानचे प्रा. मोहन पन्नालाल बुंदेले, विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. संतोष कुंटे, माजी महापौर निखिलेश दिवेकर, प्राचार्य रामेश्वर भिसे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top