social awareness :राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना जिल्हा समितीच्या सदस्यपदी ह. भ. प. दामोदर उर्फ दामुअण्णा शिंगणे यांची निवड करण्यात आली आहे.

वारकरी संप्रदायाच्या सेवेला मान; दामुअण्णा शिंगणे यांची मानधन सन्मान योजना समितीवर निवड
साखरखेर्डा : राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना जिल्हा समितीच्या सदस्यपदी ह. भ. प. दामोदर उर्फ दामुअण्णा शिंगणे यांची निवड करण्यात आली आहे.
राजकारणातून समाजकारण आणि समाजकारणातून समाजप्रबोधनाचा वसा घेत दामुअण्णा शिंगणे हे कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करीत आहेत. त्यांनी बुलढाणा जिल्हा वारकरी महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे. वारकरी संप्रदाय तसेच भजनी मंडळांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क निर्माण झाला आहे.
साखरखेर्डा तालुक्याच्या निर्मितीच्या मागणीसाठी त्यांनी सातत्याने आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले होते. यासाठी बेमुदत उपोषण तसेच मुंडण आंदोलनही त्यांनी केले होते. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेत त्यांनी आजवर समाजप्रबोधनाचे कार्य सुरू ठेवले आहे.
त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि समाजप्रबोधनाच्या कार्याची दखल घेऊन राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना जिल्हा समितीवर त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे ग्रामीण भागातील साहित्यिक व कलावंतांना शासनाच्या सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
ग्रामीण भागातील पात्र कलावंतांना कलावंत सन्मान योजनेत सहभागी करून घेणे आणि त्यांना शासनाकडून मानधन मिळवून देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे ह. भ. प. दामुअण्णा शिंगणे यांनी सांगितले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

