Mahabreaking

[breaking_news]

Neeta Sandeep Gavai :जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर नीता संदीप गवई यांची निवड

Neeta Sandeep Gavai : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अधिकृत गैर-सरकारी सदस्यपदी सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. नीता संदीप गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले असून, जिल्ह्यातील ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या समस्यांना प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Neeta

ग्राहकांच्या हक्कांसाठी आता नीता गवई मैदानात; जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर नियुक्ती

अकोला : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अधिकृत गैर-सरकारी सदस्यपदी सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. नीता संदीप गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले असून, जिल्ह्यातील ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या समस्यांना प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, व्यापारी आणि ग्राहकांमधील वादांना योग्य तोडगा मिळावा तसेच ग्राहकांना न्याय मिळावा, या उद्देशाने ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ अंतर्गत जिल्हा पातळीवर ग्राहक संरक्षण परिषद कार्यरत असते. जिल्हाधिकारी हे या परिषदेचे अध्यक्ष असतात.

ग्राहकांच्या हक्कांसाठी प्रभावी काम करण्याची जबाबदारी

परिषद सदस्य म्हणून सौ. नीता गवई यांच्यावर ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असणार आहेत. अन्नपदार्थ, औषधे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसेच दैनंदिन वापरातील इतर वस्तूंच्या खरेदी-विक्रीमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी त्या पाठपुरावा करणार आहेत.

ग्रामीण तसेच शहरी भागात ग्राहक जनजागृती अभियान राबवून नागरिकांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती देणे, यावरही त्या भर देणार आहेत. तसेच अवाजवी दर आकारणे, निकृष्ट दर्जाच्या वस्तूंची विक्री, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि सेवांमध्ये त्रुटी यासंदर्भातील ग्राहकांच्या तक्रारी परिषदेसमोर मांडून त्यांच्या निवारणासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

बाजारपेठेतील काळाबाजार, भेसळ, वजन-मापातील फसवणूक आदी प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना करण्यासाठीही पुढाकार घेतला जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिषदांच्या बैठकीत जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्या प्रभावीपणे मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाहीही सौ. नीता गवई यांनी दिली आहे.

“ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही”

निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सौ. नीता संदीप गवई म्हणाल्या, “जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर झालेली निवड ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. आजच्या डिजिटल आणि बदलत्या बाजारपेठेच्या युगात सामान्य ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवणे तसेच प्रत्येक ग्राहकाला त्याच्या हक्कांची जाणीव करून देणे हे माझे प्राथमिक कर्तव्य असेल. जिल्ह्यातील कोणत्याही ग्राहकावर अन्याय झाल्यास त्यांनी परिषदेकडे अथवा माझ्याशी निःसंकोचपणे संपर्क साधावा.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top