horrific accident : बाळापूर-पातूर मार्गावरील देवळगावजवळ मंगळवारी रात्री सुमारे ८.१५ वाजता झालेल्या भीषण रस्ते अपघातात २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. गौरव संतोष बळकर (वय २१, रा. बाभुळगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. ट्रक आणि दुचाकी (क्र. एमएच ३० बीव्ही ४९६३) यांच्यात जोरदार धडक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पातूरकडे जाताना काळाचा घाला; बाभुळगावच्या गौरवचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
ज़ाकीर अहमद शेख
बाळापूर : बाळापूर-पातूर मार्गावरील देवळगावजवळ मंगळवारी रात्री सुमारे ८.१५ वाजता झालेल्या भीषण रस्ते अपघातात २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. गौरव संतोष बळकर (वय २१, रा. बाभुळगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. ट्रक आणि दुचाकी (क्र. एमएच ३० बीव्ही ४९६३) यांच्यात जोरदार धडक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव बळकर हा आपल्या दुचाकीने बाभुळगाव येथून पातूरच्या दिशेने जात होता. देऊळगाव परिसरात त्याच्या दुचाकीची ट्रकसोबत जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, गौरव याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
अवघ्या २१व्या वर्षी गौरववर काळाने घाला घातल्याने बाभुळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची नेमकी कारणे तसेच घटनेची सविस्तर माहिती पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

