Mahabreaking

[breaking_news]

  Bloody clash :पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच रक्तरंजित संघर्ष! नगरसेवकासह दोघांचा मृत्यू; देऊळगाव राजात तणाव

Bloody clash : कव्वालीच्या कार्यक्रमात मुलांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून सुरू झालेल्या वादाचे सोमवारी रात्री सशस्त्र संघर्षात रूपांतर झाले. देऊळगाव राजा पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरच दोन गट आमनेसामने येत त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या संघर्षात चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी शिंदेसेनेचे नगरसेवक शेख अन्वर शेख अली आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आरिफ खान हारून खान पठाण या दोघांचा जालना येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. या रक्तरंजित संघर्षामुळे देऊळगाव राजा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Bloody clash

 कव्वालीतील मुलांच्या भांडणाचे भीषण पर्यवसान; दोन गटांत तलवार-चाकूने हल्ला, दोघांचा मृत्यू

गजानन तिडके

देऊळगाव राजा : कव्वालीच्या कार्यक्रमात मुलांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून सुरू झालेल्या वादाचे सोमवारी रात्री सशस्त्र संघर्षात रूपांतर झाले. देऊळगाव राजा पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरच दोन गट आमनेसामने येत त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या संघर्षात चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी शिंदेसेनेचे नगरसेवक शेख अन्वर शेख अली आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आरिफ खान हारून खान पठाण या दोघांचा जालना येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. या रक्तरंजित संघर्षामुळे देऊळगाव राजा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री देऊळगाव राजा येथील आठवडी बाजार परिसरात आयोजित कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान काही मुलांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचे पडसाद सोमवारी उमटले. सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पुन्हा दोन्ही गटांत वाद झाला. त्यानंतर परस्परांविरोधात तक्रार देण्यासाठी आणि वाद मिटविण्यासाठी दोन्ही गटांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आल्याची माहिती आहे.

पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरच सशस्त्र हल्ला

पोलिस ठाण्यात दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा बाचाबाची सुरू झाली. हा वाद विकोपाला जाऊन पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरच दोन्ही गटांत सशस्त्र संघर्ष उफाळला. यावेळी परस्परांवर शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात तलवार आणि चाकूचा वापर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, प्रत्यक्षात कोणत्या शस्त्रांचा वापर करण्यात आला, याची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. पोलिस ठाण्यासमोरच घडलेल्या या हिंसक घटनेमुळे शहरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.

उपचारादरम्यान नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

या सशस्त्र संघर्षात चार जण जखमी झाले. त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या शिंदेसेनेचे नगरसेवक शेख अन्वर शेख अली आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आरिफ खान हारून खान पठाण यांना पुढील उपचारांसाठी जालना येथे हलविण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच दोघांची प्राणज्योत मालवली. या घटनेत अन्य दोघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन राजकीय गटांतील संघर्षातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली, तरी या रक्तरंजित संघर्षामागील नेमके कारण आणि घटनाक्रम पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

पोलिस अधीक्षक मध्यरात्री घटनास्थळी; शहरात कडेकोट बंदोबस्त

घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली. पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी मध्यरात्री देऊळगाव राजा येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संवेदनशील भागांत पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, मुलांच्या किरकोळ भांडणातून सुरू झालेल्या वादाचे थेट सशस्त्र संघर्षात रूपांतर होऊन नगरसेवकासह दोघांना जीव गमवावा लागल्याने देऊळगाव राजा शहरात खळबळ उडाली आहे. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल झाली नव्हती. पोलिसांकडून घटनेचा सविस्तर तपास सुरू असून, या संघर्षातील सहभागी व्यक्ती, हल्ल्याचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित होणे बाकी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top