Mahabreaking

[breaking_news]

Chandrashekhar Bawankule :पंचनामे अचूक व जलद करा; रोजगार, चारा-पाणी आणि जलसंधारणाला प्राधान्य —ना.चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे हे शासनाचे प्राधान्य असून, त्यांना भरीव मदतीबरोबरच ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, पशुधनासाठी वैरण व्यवस्था, पेयजल उपलब्धता आणि जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणावर राबविण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Chandrashekhar Bawankule

 दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करणार; महसूल मंत्र्यांकडून दुष्काळी भागाची पाहणी

अकोला  : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे हे शासनाचे प्राधान्य असून, त्यांना भरीव मदतीबरोबरच ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, पशुधनासाठी वैरण व्यवस्था, पेयजल उपलब्धता आणि जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणावर राबविण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Chandrashekhar Bawankule

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळजन्य परिस्थितीवरील उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी अकोला तालुक्यातील येवता तसेच बाळापूर तालुक्यातील मानकी येथील दुष्काळग्रस्त परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे शेतकरी व नागरिकांकडून निवेदने स्वीकारली. तसेच शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना दिलासा दिला.

यावेळी राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल आणि महापौर शारदा खेडकर आदी उपस्थित होते.

अचूक पंचनाम्यांना प्राधान्य

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, केंद्र शासनाकडून अधिकाधिक मदत मिळविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निकषांनुसार अचूक पंचनामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे पंचनामे जलदगतीने आणि अचूकपणे पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा व पाणी, पीक पंचनामे तसेच शेतीसाठी पाणीपुरवठा या बाबींना प्राधान्य देऊन प्रशासकीय यंत्रणेने युद्धपातळीवर आणि परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

केंद्र शासनाच्या मदतीबरोबरच राज्य शासनाकडूनही भरीव मदत करण्यात येईल. पीक विमा योजना आणि इतर शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच रोजगारनिर्मिती व जलसंधारणाची अधिकाधिक कामे हाती घेण्यात येतील. पेयजल उपलब्धतेच्या दृष्टीने पाण्याचे योग्य नियोजन करण्यात येईल.

‘गावातले पाणी गावात, शिवारातले पाणी शिवारात’

‘गावातले पाणी गावात, शिवारातले पाणी शिवारात’ या संकल्पनेनुसार पाण्याचा थेंब न् थेंब वाचविण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणावर राबविण्यात येतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

दुष्काळामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा भक्कमपणे उभी आहे. जिल्हा नियोजन निधीचा दुष्काळ निवारणासाठी प्रभावी वापर करण्यात येईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून, बँकांनीही शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेत त्यांना संपूर्ण सहकार्य करावे. दुष्काळी परिस्थितीत कोणत्याही शेतकऱ्याकडे कर्जवसुलीसाठी सक्तीचा तगादा लावू नये, असे निर्देश त्यांनी दिले.

अवैध सावकारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक किंवा फसवणूक होत असल्यास नागरिकांनी न घाबरता संबंधित यंत्रणेकडे थेट अर्ज करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शेतकरी बांधवांच्या पाठीशी संपूर्ण यंत्रणा

दुष्काळाच्या संकटात शेतकरी बांधवांनी हिंमत सोडू नये. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी असून, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Chandrashekhar Bawankule

शेतकऱ्यांशी संवाद अन् शिदोरीचे जेवण

महसूल मंत्री बावनकुळे यांनी येवता येथील शेतकरी शेख रशीद शेख इस्माईल यांच्या शेतात तसेच बाळापूर तालुक्यातील हरिश्चंद्र शिरसाठ यांच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेख रजू शेख रशीद यांनी शेतात विहीर असूनही पाण्याची कमतरता आणि भूजल पातळीत झालेली घट याबाबत महसूल मंत्र्यांना माहिती दिली.

त्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी देगाव शेतकरी बंधाऱ्यावर संजय अवचार यांच्या शेतात पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत शिदोरीचे जेवण घेत संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान अनेक पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top