drinking water : यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने घाटबोरी परिसरात पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. गट ग्रामपंचायत घाटबोरी क्षेत्रातील पाझर तलावात सध्या केवळ ३० ते ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तलावातील पाण्याचा शेतीसाठी सुरू असलेला बेसुमार उपसा तात्काळ थांबविण्यासाठी तलावावरील वीजपुरवठा खंडित करण्यात यावा, अशी मागणी घाटबोरी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.

घाटबोरी, टेंभूर्खेडा, नागेशवाडीची तहान भागविणाऱ्या तलावावर संकट; वीजपुरवठा बंद करण्यासाठी तहसीलदारांकडे निवेदन
डोणगाव : यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने घाटबोरी परिसरात पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. गट ग्रामपंचायत घाटबोरी क्षेत्रातील पाझर तलावात सध्या केवळ ३० ते ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तलावातील पाण्याचा शेतीसाठी सुरू असलेला बेसुमार उपसा तात्काळ थांबविण्यासाठी तलावावरील वीजपुरवठा खंडित करण्यात यावा, अशी मागणी घाटबोरी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात ग्रामपंचायत अधिकारी शरद वानखेडे यांनी तहसीलदार, मेहकर यांच्याकडे निवेदन साद केले आहे. घाटबोरी, टेंभूर्खेडा आणि नागेशवाडी या तिन्ही गावांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याच पाझर तलावावर अवलंबून आहे. मात्र, सध्या तलावातून शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा सुरू असल्याने उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.
पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन तलावातील पाणी भविष्यासाठी राखीव ठेवणे आवश्यक असल्याचे ग्रामपंचायतीने निवेदनात नमूद केले आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच उपाययोजना म्हणून पाझर तलावावरील शेतीसाठी होणारा पाणीउपसा तात्काळ बंद करावा आणि त्यासाठी तलावावरील वीजपुरवठा खंडित करावा, अशी मागणी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार, मेहकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी पाणी राखीव ठेवणे गरजेचे
शरद वानखेडे, ग्रामपंचायत अधिकारी, घाटबोरी :
“सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता आगामी काळात परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पिण्यासाठी पाणी भविष्यात आवश्यक असल्याने पाझर तलावातील पाणीसाठा राखीव ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही वीजपुरवठा खंडित करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनीही ग्रामपंचायतीला सहकार्य करून पाझर तलावातून पाण्याचा उपसा करू नये.”
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

