Mahabreaking

[breaking_news]

farmer dies : कर्जाचा वाढता ताण, शेतीचे नुकसान अन् घटलेले उत्पन्न; रुईखेड मायंबात शेतकऱ्याची आत्महत्या 

farmer dies : बुलढाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथे पंजाबराव रामेकर (वय ५२) या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना  मंगळवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. बँकेचे कर्ज, पिकांचे नुकसान आणि घटलेले उत्पन्न यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.

farmer dies

 अडीच एकर शेती, कर्जाचा भार अन् मोलमजुरीचा आधार; पंजाबराव रामेकर यांच्या मृत्यूने कुटुंबावर संकट

बबन फेपाळे

रुईखेड मायंबा : बुलढाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथे पंजाबराव रामेकर (वय ५२) या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना  मंगळवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. बँकेचे कर्ज, पिकांचे नुकसान आणि घटलेले उत्पन्न यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.

पंजाबराव रामेकर यांच्या कुटुंबाकडे सुमारे अडीच एकर शेती आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्न अपुरे असल्याने ते स्वतः दुसरीकडे कायमस्वरूपी रोजंदारीवर शेतीकाम करीत होते. त्यांची पत्नी आणि मुलगाही मोलमजुरी करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहास हातभार लावत होते.

कर्जाच्या परतफेडीचा वाढता ताण

२०२५-२६ या वर्षात पंजाबराव यांनी एचडीएफसी बँक तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, चांडोळ शाखेतून कृषी व पीक कर्ज घेतले होते. मात्र, उत्पन्नात झालेली घट आणि कर्जाच्या परतफेडीचा वाढता ताण यामुळे कुटुंब आर्थिक अडचणीत आले होते, असे कुटुंबीयांनी सांगितले.

शासनाच्या कर्जमाफीच्या यादीत पंजाबराव यांचे नाव नसल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

सुरतहून परतल्यानंतर शेती-मोलमजुरीचा आधार

सुमारे दहा वर्षांपूर्वी पंजाबराव उदरनिर्वाहासाठी सुरत येथे गेले होते. तेथे काम करून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मात्र, सुरत येथील रोजगाराची परिस्थिती प्रतिकूल झाल्यानंतर ते पुन्हा मूळ गावी परतले. त्यानंतर शेतीसोबत मोलमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

पिकांच्या नुकसानीच्या चिंतेत टोकाचे पाऊल

यंदा पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे आर्थिक अडचणी आणखी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पंजाबराव यांनी टोकाचे पाऊल उचलत 27 सप्टेंबर रोजी विष प्राशन केले. त्यांचा उपचारादरम्यान 29 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला.

पंजाबराव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. शासनाने या प्रकरणाची चौकशी करून पीडित कुटुंबाला नियमानुसार आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top