Mahabreaking

[breaking_news]

dogs: चिमुकलीला कुत्र्यांनी घेरताच नागरिक धावले; बाळापूरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

dogs: चिमुकलीला कुत्र्यांनी घेरताच नागरिक धावले; बाळापूरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर छोटा मोमीनपुरा रोडवरील टट्टा कॉलेजजवळ एका पाच वर्षांच्या चिमुकलीला भटक्या कुत्र्यांनी घेरल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने परिसरातील नागरिकांनी वेळीच धाव घेत चिमुकलीची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. नागरिकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

dogs

भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; पाच वर्षांच्या चिमुकलीवर संकट, नगर परिषद प्रशासन कधी जागे होणार?

बाळापूर : छोटा मोमीनपुरा रोडवरील टट्टा कॉलेजजवळ एका पाच वर्षांच्या चिमुकलीला भटक्या कुत्र्यांनी घेरल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने परिसरातील नागरिकांनी वेळीच धाव घेत चिमुकलीची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. नागरिकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यांवर तसेच वर्दळीच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडून भटक्या कुत्र्यांना पकडण्याची ठोस मोहीम केव्हा राबविण्यात येणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एखादी मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार आहे का, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नगर परिषद प्रशासनाने केवळ आश्वासने न देता भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे. आणखी एखाद्या गंभीर दुर्घटनेची वाट न पाहता प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा बाळापूरकर व्यक्त करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top