Mahabreaking

[breaking_news]

Dispute :  ‘झाड माझ्या धुऱ्यावर आहे’ म्हणत वाद; कुऱ्हाडीचा घाव गळ्याजवळ लागल्याने शेतकरी जखमी

Dispute : तालुक्यातील सिनगाव पांगरी परिसरातील पांगरी शिवारात सामाईक बांधावरील झाड तोडण्याच्या कारणावरून दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. या वादातून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून जखमी केल्याची घटना २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Case registered

सामाईक बांधावरील झाड तोडण्यावरून वाद; कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न, शेतकरी जखमी

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : तालुक्यातील सिनगाव पांगरी परिसरातील पांगरी शिवारात सामाईक बांधावरील झाड तोडण्याच्या कारणावरून दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. या वादातून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून जखमी केल्याची घटना २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश ज्ञानदेव वाघ (वय ५०, व्यवसाय शेती, रा. सिनगाव पांगरी, ता. देऊळगाव राजा) आणि आरोपी शंकर कोंडीबा वाघ (रा. सिनगाव पांगरी) यांची शेती शेजारीशेजारी आहे. घटनेच्या वेळी आरोपी हा दोघांच्या सामाईक बांधावरील झाड तोडत असल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले.

यावेळी अंकुश वाघ यांनी आरोपीला सामाईक बांधावरील झाड का तोडत आहात, अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने सदर झाड आपल्या धुऱ्यावर असल्याचे सांगत फिर्यादीसोबत वाद घालण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

पत्नी-मुलगा मध्यस्थीसाठी आले

आरोपीचा आवाज ऐकून फिर्यादीची पत्नी आणि मुलगा घटनास्थळी आले. त्यांनी आरोपीला शिवीगाळ का करता, अशी विचारणा करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांनाही धमकावून ‘मध्ये आल्यास जीवे मारून टाकतो’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.

दरम्यान, फिर्यादी, त्यांची पत्नी आणि मुलगा आरोपीला समजावून सांगत असताना आरोपीने हातातील कुऱ्हाडीने अंकुश वाघ यांच्यावर वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. हा वार फिर्यादीच्या गळ्याजवळ लागल्याने ते जखमी झाले. त्यानंतर फिर्यादीच्या पत्नी व मुलाने त्यांना आरोपीच्या तावडीतून सोडविल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

यावेळी आरोपीने अश्लील शिवीगाळ करून पुन्हा मध्ये आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी अंकुश ज्ञानदेव वाघ यांच्या तोंडी फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायमी अप क्रमांक ४३९/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), २९६, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा २६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३४ वाजता दाखल करण्यात आला. पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन काकड (बकल नंबर २०५०) यांनी गुन्हा नोंदवून घेतला.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे (बकल नंबर १२०२) करीत आहेत. घटनेबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top