Drought : राज्य सरकारने खरीप हंगाम २०२६ साठी राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. या निर्णयाचे शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले असून, आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष आणि भरीव आर्थिक मदत पोहोचवावी, अशी मागणी समितीने केली आहे. दुष्काळाची घोषणा झाली असली तरी शेतकऱ्यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही समितीने केले आहे.

‘दुष्काळ जाहीर करा’च्या इशाऱ्याची शासनाने घेतली दखल; शेतकरी योद्धा कृती समितीचा आता हेक्टरी ५० हजारांची मागणी
साखरखेर्डा : राज्य सरकारने खरीप हंगाम २०२६ साठी राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. या निर्णयाचे शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले असून, आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष आणि भरीव आर्थिक मदत पोहोचवावी, अशी मागणी समितीने केली आहे. दुष्काळाची घोषणा झाली असली तरी शेतकऱ्यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही समितीने केले आहे.
शेतकरी योद्धा कृती समितीच्या माध्यमातून प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला होता की, २७ सप्टेंबरपर्यंत दुष्काळ जाहीर करावा; अन्यथा २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची व्यथा शासनापर्यंत पोहोचविण्यात आली होती.
आता शासनाने दुष्काळ जाहीर केल्याने समितीच्या निवेदनाची आणि शेतकऱ्यांच्या मागणीची शासनाने दखल घेतल्याची भावना समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. या लढ्यात सरकारकडे ठामपणे मागणी मांडणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचे समितीने अभिनंदन केले आहे.
बांधावर जाऊन पाहिली शेतकऱ्यांची व्यथा
शेतकरी योद्धा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. करपलेली पिके, रिकाम्या शेंगा, पिकांची झालेली अवस्था आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहिल्याचा उल्लेख समितीने केला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि मशागतीवर मोठा खर्च केला; मात्र पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन खर्चही भरून निघण्याची परिस्थिती नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधाराची गरज असताना त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकरी योद्धा कृती समितीने सातत्याने पाठपुरावा केला, असे समितीने म्हटले आहे.
पत्रकार बांधवांचे योगदान महत्त्वाचे
या आंदोलनात बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समितीने नमूद केले आहे. पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा, करपलेली पिके आणि निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती माध्यमांच्या माध्यमातून शासन व समाजासमोर मांडली. त्यामुळे या लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचे शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
दुष्काळ जाहीर झाला; आता हेक्टरी ५० हजारांची मागणी
दुष्काळ जाहीर झाला असला तरी केवळ घोषणा करून शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नाहीत, अशी भूमिका समितीने घेतली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीने मदत द्यावी, अशी समितीची प्रमुख मागणी आहे.आठ हजार, दहा हजार किंवा बारा हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांनी केलेला उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी अपुरी ठरू शकते, असा दावा समितीने केला आहे. त्यामुळे शेतकऱ्याने केलेला खर्च, झालेली पीकहानी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची गरज लक्षात घेऊन शासनाने भरीव मदत निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.राज्य शासनाच्या दुष्काळ निर्णयानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी विविध सवलती व उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत; मात्र प्रत्यक्ष मदत आणि त्याची अंमलबजावणी याकडे शेतकरी संघटनांचे लक्ष राहणार आहे.
‘लढा अजून संपलेला नाही’
“दुष्काळ जाहीर झाला म्हणजे शेतकऱ्याच्या हातात पैसा आला असे नाही. शेतकऱ्याला त्याचा गेलेला उत्पादन खर्च आणि जगण्यासाठी आवश्यक असलेली ठोस मदत मिळाली पाहिजे,” अशी भूमिका शेतकरी योद्धा कृती समितीने व्यक्त केली आहे.शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मार्गी लागेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. “दुष्काळ जाहीर झाला; आता मदतही ठोस द्या. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील,” असे शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

