Mahabreaking

[breaking_news]

Four arrested: ट्रकचालकाला मारहाण करून ट्रक पळविणारे चौघे जेरबंद, स्कोडा गाडीही जप्त

Four arrested: समृद्धी महामार्गावरील डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चॅनेल क्रमांक २६९ येथे ट्रकचालक व क्लिनरला मारहाण करून ट्रकसह त्यातील कांदा जबरीने घेऊन गेल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिसांनी आणि महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मलकापूर मध्यवर्ती पथकाने तातडीने हालचाल करीत ट्रक, स्कोडा कार आणि चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

Four

  तांत्रिक तपासातून ट्रकचा माग काढला; डोणगाव पोलिस व महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या संयुक्त पथकाची कारवाई

डोणगाव  : समृद्धी महामार्गावरील डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चॅनेल क्रमांक २६९ येथे ट्रकचालक व क्लिनरला मारहाण करून ट्रकसह त्यातील कांदा जबरीने घेऊन गेल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिसांनी आणि महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मलकापूर मध्यवर्ती पथकाने तातडीने हालचाल करीत ट्रक, स्कोडा कार आणि चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कोडा कारमधून आलेल्या आरोपींनी समृद्धी महामार्गावर ट्रक अडवून चालक व क्लिनरला मारहाण केली. त्यानंतर ट्रक आणि त्यातील कांदा जबरीने घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश इंगोले व त्यांच्या पथकाने तसेच मलकापूर मध्यवर्ती पोलीस केंद्रातील रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रकचालकाकडून घटनेची माहिती घेत तातडीने तपासाला सुरुवात केली.

या प्रकरणात वापरण्यात आलेल्या CG-04-PP-9113 क्रमांकाच्या ट्रकची तांत्रिक मदतीने माहिती घेण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अमानी टॅपचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सरनाईक यांच्याशी संपर्क साधला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ट्रक, स्कोडा कार आणि चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

या प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात रॉबरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

चौघे संशयित पोलिसांच्या ताब्यात

या कारवाईत तेजस विलास ढोमसे, गौरव हरीभाऊ पानसरे, विश्वजित निवृत्ती ढोमसे आणि आशुदेव दास कोलकता (पश्चिम बंगाल) या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून संबंधित ट्रक तसेच गुन्ह्यात वापरल्याचे सांगितलेले स्कोडा वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश इंगोले व त्यांच्या पथकाने केली.

कारवाई पथकात पोलिसांचा सहभाग

या कारवाईमध्ये डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश इंगोले, पोलीस कॉन्स्टेबल हर्ष सहगल, तसेच एपीआय राहुल पाटील, पीएसआय प्रकाश सरनाईक, एएसआय मंगेश खडसे, हेड कॉन्स्टेबल आशिष राऊत, पोलीस कॉन्स्टेबल रामप्रसाद डोळे, पोलीस कॉन्स्टेबल नासिर शेख, रोशन शेख, हरिओम काकडे यांच्यासह महामार्ग सुरक्षा पथक, बुलढाणा यांचा सहभाग होता.

Four

‘महाराष्ट्र शासन’ पाटी व सायरनबाबत चौकशी

दरम्यान, संशयितांनी वापरलेल्या स्कोडा कारवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावलेली असून वाहनाला सायरनही असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या बाबीची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडे यांनी दिली.

खासगी वाहनावर अशा प्रकारे ‘महाराष्ट्र शासन’ किंवा ‘पोलीस’ असा उल्लेख करून अथवा सायरनचा अनधिकृत वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

समृद्धी महामार्गावर घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे काही तासांतच संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणाच्या पुढील तपासातून ट्रक लुटीमागील नेमकी पार्श्वभूमी आणि वाहनावरील ‘महाराष्ट्र शासन’ पाटी व सायरनच्या वापराबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top