Balaji Vidyalaya : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जस नागरा पब्लिक स्कूल येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेत बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील बालाजी इंग्रजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली.
बुद्धिबळात सहा, कुस्तीत तीन विद्यार्थ्यांचे यश; बालाजी विद्यालयाची जिल्हास्तरासाठी आगेकूच
राहुल सोनोने
वाडेगाव : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जस नागरा पब्लिक स्कूल येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेत बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील बालाजी इंग्रजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली.
बुद्धिबळ स्पर्धेत बालाजी इंग्रजी विद्यालयाच्या प्राची भारसाकळे, निधी तायडे, कार्तिकी ताले, वेदिका ताले, प्रसाद सोनटक्के आणि पियुष वाकचौरे या सहा विद्यार्थ्यांनी विजय मिळवला. त्यांच्या या यशामुळे त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दरम्यान, तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन जागेश्वर विद्यालय, वाडेगाव येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत बालाजी विद्यालयाच्या संस्कृती पुंडे, कृष्णाली पाखरे आणि प्रसाद पुंडे या तीन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले. त्यांच्या कामगिरीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाला विशेष अधोरेखित झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष विलास वरोकार, मुख्याध्यापक दीपक मसने, मुख्याध्यापिका वर्षा पांडे मॅडम, क्रीडा शिक्षक ठाकरे, वरोकार, इंगळे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पालकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
बालाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे वाडेगाव परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

