Mahabreaking

[breaking_news]

equipment stolen: दुष्काळाच्या संकटात चोरट्यांचा घाला; कारेगाव परिसरातील १० ते १२ शेतकऱ्यांचे शेती साहित्य चोरीला

equipment stolen: लोणार तालुक्यातील कारेगाव परिसरात १८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी साहित्यावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. परिसरातील सुमारे १० ते १२ शेतकऱ्यांच्या शेतातील स्प्रिंकलरचे नोजल, पाण्याच्या पंपाच्या केबल आणि सर्व्हिस केबल चोरीला गेल्या आहेत. या चोरीमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

equipment

  पिके वाचवण्यासाठी स्प्रिंकलरचा आधार, चोरट्यांनी केबलच पळवले; शेतकऱ्यांना आर्थिक फटका

भागवत चव्हाण

कारेगाव  : लोणार तालुक्यातील कारेगाव परिसरात १८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी साहित्यावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. परिसरातील सुमारे १० ते १२ शेतकऱ्यांच्या शेतातील स्प्रिंकलरचे नोजल, पाण्याच्या पंपाच्या केबल आणि सर्व्हिस केबल चोरीला गेल्या आहेत. या चोरीमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पिके वाचविण्यासाठी लावलेल्या स्प्रिंकलरवरच चोरट्यांचा डल्ला

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने कारेगाव परिसरातील शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. सोयाबीन पिके करपण्याच्या परिस्थितीत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकांना आधार देण्यासाठी शेतात स्प्रिंकलरची व्यवस्था केली होती. मात्र, शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभारलेल्या या सिंचन व्यवस्थेवर चोरट्यांनी हात साफ केल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. स्प्रिंकलरचे नोजल तसेच पाण्याच्या पंपाच्या केबल चोरीला गेल्यामुळे पिकांना पाणी देण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.

केबल जाळून तांबे काढल्याचा संशय

चोरी करण्यात आलेल्या पंपाच्या केबलपैकी काही केबल एका ठिकाणी जाळण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामधील तांबे काढून नेण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारामुळे शेती साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिस प्रशासनासमोर उभे राहिले आहे. शेती साहित्य चोरीला गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून, पिकांना पाणी देण्यासाठी पुन्हा साहित्य खरेदी करण्याचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांची चिंता वाढली

आधीच निसर्गाच्या अनियमिततेमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने सोयाबीन पिके सुकण्याची आणि करपण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा वापर करून पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र, शेती साहित्य चोरीला गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोणार आणि मेहकर तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. पर्जन्यमापक यंत्रे उपलब्ध असतानाही या भागाचा दुष्काळी परिस्थितीच्या निकषांनुसार विचार का केला जात नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

कारेगाव परिसरात झालेल्या शेती साहित्य चोरीची गांभीर्याने दखल घेऊन पोलिस प्रशासनाने तपास करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. चोरीला गेलेले साहित्य परत मिळावे तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परिसरात गस्त वाढवावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दुष्काळ, पिकांचे नुकसान आणि वाढता खर्च अशा अनेक संकटांना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना चोरीच्या घटनांमुळे आणखी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top