Bus collides : देऊळगाव राजा बसस्थानकासमोर भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या बसने दुचाकीला समोरून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव बसने दुचाकीला समोरून उडवले; नागोराव घोरपडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू
गजानन तिडके
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा बसस्थानकासमोर भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या बसने दुचाकीला समोरून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागोराव सुंदराव घोरपडे (वय ३२, रा. हनुमान घाट, जालना) हे दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास एमएच-२८-सीयू-६५८५ क्रमांकाच्या दुचाकीने देऊळगाव राजा बसस्थानक चौकाकडे जात होते. यावेळी बसस्थानकातून बाहेर येणारी एमएच-१३-सीयू-७४६४ क्रमांकाची बस चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याचा आरोप आहे.
बसने नागोराव घोरपडे यांच्या दुचाकीला समोरून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी त्यांच्या पत्नी शोभा नागोराव घोरपडे (वय ३१, व्यवसाय-घरकाम, रा. हनुमान घाट, जालना) यांनी पोलिसांत तोंडी फिर्याद दिली.
फिर्याद व उपचारासंबंधी कागदपत्रांच्या आधारे देऊळगाव राजा पोलिसांनी कायमी अपघात क्रमांक ४२३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २८१ व १०६(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
हा गुन्हा दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९.४० वाजता दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे (ब.नं. २१५५) यांनी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद गवई (ब.नं. १४१) करीत आहेत. तपासादरम्यान अपघाताची नेमकी परिस्थिती, बसचालकाची भूमिका आणि इतर बाबींची चौकशी केली जात आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

