Mahabreaking

[breaking_news]

Suryaputra Bhaiyasaheb Ambedkar :तांदळी बुद्रुक येथे सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभा

Suryaputra Bhaiyasaheb Ambedkar : भारतीय बौद्ध महासभा, पातूर तालुक्याच्या वतीने गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी तांदळी बुद्रुक येथे सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी भय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले.

Bhaiyasaheb Ambedkar

  भारतीय बौद्ध महासभेतर्फे भय्यासाहेब आंबेडकरांना अभिवादन; २०२५ मिशनअंतर्गत बैठक व ग्राम शाखेची स्थापना

राहुल सोनोने

दिग्रस बु. : भारतीय बौद्ध महासभा, पातूर तालुक्याच्या वतीने गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी तांदळी बुद्रुक येथे सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी भय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले.

या कार्यक्रमासोबतच २०२५ मिशनअंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत भारतीय बौद्ध महासभेच्या संघटनात्मक कार्याबाबत चर्चा करण्यात आली. याच कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेच्या ग्राम शाखेची स्थापना करण्यात आली. नव्याने स्थापन झालेल्या ग्राम शाखेच्या कार्यकारिणीतील पदाधिकारी व महिला शाखेच्या कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाला निरीक्षक विजय हिवराळे, जिल्हा उपाध्यक्ष संरक्षण विभाग गणेश दंदी, जिल्हा सचिव संरक्षण व बैठकीचे अध्यक्ष राजेश सरकटे, तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा राहुल अंभोरे, तालुका सरचिटणीस विजय खंडेराव, पातूर शहर सरचिटणीस बळीराम खंडारे, तालुका कोषाध्यक्ष विलासराव गवई, तालुका उपाध्यक्ष संस्कार विभाग धीरज वानखडे, तालुका उपाध्यक्ष संरक्षण बाबुराव अंभोरे, कार्यालयीन सचिव रमेश तेलगोटे, सचिव पर्यटन मिलिंद सरकटे, संघटक प्रशांत शिरसाट, संघटक दीपक कंकाळ, प्रमोद शिरसाट, राहुल मोहाडे, संतोष ताजने यांची उपस्थिती होती.

तसेच तालुका सचिव रिनाताई मोहाडे, महिला तालुका अध्यक्षा, भारतीय बौद्ध महासभा पातूर सपना सुरवाडे, महिला तालुका सरचिटणीस छायाताई ताजने, महिला उपाध्यक्षा संस्कार विभाग पातूर यांच्यासह दादाराव गाडेकर, अरविंद कंकाळ, भारत सुरवाडे, नागसेन सरकटे, देवमन खंडेराव, धम्मा खंडेराव उपस्थित होते.

यावेळी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महिला ग्राम शाखा कार्यकारिणी तसेच भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी तरुण संघाने विशेष सहकार्य केले.

अभिवादन सभा, संघटनात्मक बैठक आणि ग्राम शाखेच्या स्थापनेमुळे तांदळी बुद्रुक येथे भारतीय बौद्ध महासभेच्या संघटनात्मक कार्याला बळ मिळाले असून, आगामी काळात ग्रामस्तरावर संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top