Sindkhed Dominates : महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोताळा तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत सिंदखेड येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने दमदार कामगिरी करत अंतिम विजेतेपद पटकावले.

सिंदखेडच्या शिलेदारांची दमदार कामगिरी; छत्रपती शिवाजी विद्यालयाचा कबड्डीत तालुक्यात डंका
मोताळा : महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोताळा तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत सिंदखेड येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने दमदार कामगिरी करत अंतिम विजेतेपद पटकावले.
सरस्वती विद्यालय, डिडोळा येथील मैदानावर पार पडलेल्या या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत छत्रपती शिवाजी विद्यालय, सिंदखेडच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सर्वेश जाधव (कर्णधार), श्रीकांत साळुंखे, हर्षल कृपाळ, आदित्य सूर्यवंशी, सार्थक मुंडाळे, निखिलेश कुणबीथोप, कार्तिक चौके, ओम भुसारी, भावेश मोरे आणि ओम मेहंगे या खेळाडूंचा संघात समावेश होता.
स्पर्धेत सिंदखेडच्या संघाने सहकार विद्या मंदिर, धामणगाव बढे, सरस्वती विद्यालय, डिडोळा, एम.ई.एस. हायस्कूल, धामणगाव बढे आणि बाल शिवाजी विद्यालय, धामणगाव बढे या संघांवर मात करत अंतिम विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या शानदार कामगिरीमुळे छत्रपती शिवाजी विद्यालय, सिंदखेडच्या संघाची जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून, आगामी स्पर्धेत मोताळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या खेळाडूंना मिळाली आहे. संघाला प्रशिक्षक आर. एन. आरमाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
संघाच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष योगेंद्र गोडे आणि मुख्याध्यापक सर्जेराव देशमुख यांनी विजयी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

