Mahabreaking

[breaking_news]

   Lord Ganesha :साखरखेर्डा नगरीत आठ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना; ५२ गावांत ७७ गणराय विराजमान

Lord Ganesha : साखरखेर्डा शहरात आठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्थापना करण्यात आली असून, साखरखेर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५२ गावांमध्ये एकूण ७७ ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये १३ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमांतर्गत गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Lord Ganesha

  ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाला प्रतिसाद; साखरखेर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७७ गणेशमूर्तींची स्थापना

साखरखेर्डा : साखरखेर्डा शहरात आठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्थापना करण्यात आली असून, साखरखेर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५२ गावांमध्ये एकूण ७७ ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये १३ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमांतर्गत गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

साखरखेर्डा येथे काल रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्ती स्थापनेची लगबग सुरू होती. शहरातील आठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाजत-गाजत श्री गणेशाची विधिवत स्थापना केली. यामध्ये श्री शिवाजी व्यायाम शाळा, श्री शिवाजी हायस्कूल, परदेशी गणेशोत्सव मंडळ, अहिल्याबाई होळकर गणेशोत्सव मंडळ, महात्मा ज्योतिबा फुले गणेशोत्सव मंडळ, बालनाथ गणेशोत्सव मंडळ, हिंदू सूर्य महाराणा प्रताप गणेशोत्सव मंडळ आणि संत रोहिदास गणेशोत्सव मंडळांचा समावेश आहे.

साखरखेर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १३ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमांतर्गत गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. अशा प्रकारे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ५२ गावांमध्ये ७७ ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.

काल रात्री श्री शिवाजी व्यायाम शाळा गणेश मंडळ आणि महात्मा ज्योतिबा फुले गणेश मंडळाच्या वतीने गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी ठाणेदार युवराज रबडे यांच्यासह पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, गणेश स्थापनेनंतर रात्री पावसाने दमदार हजेरी लावत गणरायाचे स्वागत केले. मात्र, पाऊस सुरू असतानाच साखरखेर्डा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. रात्रभर वीज गायब असल्याने नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली.

गणेशोत्सव काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी गणेशभक्तांकडून करण्यात आली आहे. सतत खंडित होणारा वीजपुरवठा ही परिसरातील मोठी समस्या बनली आहे. अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींकडून गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात रात्रीच्या वेळी चोरटे फिरून कुलूपबंद घरे हेरून घरफोडीच्या घटना घडत असल्याने पोलिस प्रशासनाने याकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top