Mahabreaking

[breaking_news]

Peace meeting: वाडेगावात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठक उत्साहात

Peace meeting: स्थानिक वाडेगाव पोलिस चौकीच्या हद्दीत येणाऱ्या वाडेगाव येथे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठक उत्साहात पार पडली. यावेळी गावातील सुमारे २५ गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Peace meeting

 २५ गणेश मंडळांच्या उपस्थितीत नियमांवर झाली शांतता बैठक

राहुल सोनोने

वाडेगाव : स्थानिक वाडेगाव पोलिस चौकीच्या हद्दीत येणाऱ्या वाडेगाव येथे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठक उत्साहात पार पडली. यावेळी गावातील सुमारे २५ गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपक व डीजेच्या वापराबाबत विविध नियमांची माहिती देण्यात आली. कर्कश आवाजाचा डीजे नियमानुसार ७५ डेसिबलच्या मर्यादेत ठेवावा, असे आवाहन ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी केले. तसेच लकी ड्रॉ पद्धतीने गणेश मंडळांना क्रमांक देऊन त्यानुसार एकामागोमाग एक मंडळाने मिरवणुकीत सहभागी व्हावे, अशी सूचना करण्यात आली.

याशिवाय लेझर लाईट, प्लाझ्मा सेट बॉक्सच्या आवाजासह इतर बाबींवरही चर्चा करण्यात आली. गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता रात्री १० वाजेपर्यंत करण्यासह प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले.

या बैठकीस सरपंच प्रशासक मंगेश तायडे, उपसरपंच राजेश्वर पळसकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सागर सरप, श्यामलाल लोध, प्रकाश कांदारकर, दीपक मसने, गणेश कंडारकर, सुनील मानकर, सुनील घाटोळ, दत्ता मानकर, ॲड. प्रवीण अवचार, सुधाकर भारसाकळे, नईम शेख, गजानन डोंगरे, अंकुश शहाणे, शिवा हुसे, संदीप जढाळ, संदीप बावणे, शशी लोध यांच्यासह पत्रकार मंडळी उपस्थित होती.तसेच बाळापूर-वाडेगाव पोलिस उपनिरीक्षक विनोद खाडे, रवी राऊत, सोहेल मेजर, सातव, सुरेश ढोरे आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.बैठकीचे संचालन सागर सरप यांनी केले, तर आभार पोलिस उपनिरीक्षक विनोद खाडे यांनी मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top