Mahabreaking

[breaking_news]

blood donation: थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी ८१ रक्तदात्यांचे रक्तदान; रक्तदानातून जपली माणुसकीची नाळ

blood donation: तालुक्यातील सायखेड येथील धीरज इंगळे मित्र मंडळाच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी थॅलेसेमिया या रक्तदोषाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ८१ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.

blood donation

  सलग सहा वर्षांपासून रक्तदानाची सेवा; सायखेडच्या धीरज इंगळे मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम

बबन इंगळे

बार्शीटाकळी : तालुक्यातील सायखेड येथील धीरज इंगळे मित्र मंडळाच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी थॅलेसेमिया या रक्तदोषाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ८१ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.

विशेष म्हणजे, गेल्या सहा वर्षांपासून धीरज इंगळे मित्र मंडळाच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. यापूर्वी चोहोगाव येथील थॅलेसेमियाग्रस्त एका चिमुकलीसाठी या शिबिरातून संकलित होणारा रक्तसाठा वर्षभर आरक्षित ठेवण्यात येत होता. मात्र, तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता या रक्तदान शिबिरातून संकलित होणारा रक्तसाठा अकोला जिल्ह्यातील थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रक्तसंकलन

या शिबिरातील रक्तसंकलनाची जबाबदारी थॅलेसेमिया सोसायटी, अकोला, संकल्प इंडिया फाउंडेशन आणि साई जीवन रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पाडण्यात आली. दिनेश हिवराळे, शरद तायडे, देवेंद्र हिवराळे, विद्याधर करमकर, हर्षा मेश्राम आदींनी रक्तसंकलनाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.

मान्यवरांनी भेट देऊन केले कौतुक

या रक्तदान शिबिराला ॲड. आकाश भगत, ॲड. विशाल गवई, गजानन पाटील गालट, सचिन गालट, सरपंच नितीन वाकोडे, सामाजिक कार्यकर्ते अमोल जामनिक, रक्षक जाधव, अक्षय राठोड, विकास आडोळे, वैभव देवकर, पंकज चव्हाण, संतोष इंगळे, साहेबराव वाकोडे, नागोराव जंजाळ, विकी इंगळे, मंगेश कुटे, नागेश हातोले, विद्याताई आकोडे, भारत आकोडे, अक्षय पारधी, आकाश वाकोडे, वनरक्षक रणजीत कोहर, आकाश पारधी, पवन चांभारे, कुणाल राठोड, संतोष वाकोडे, प्रशांत धाडसे, हिमांशू इंगळे, पंजाब इंगळे, राजकुमार इंगळे, दत्ता फाटे, धीरज कोहर, शुभम घुमकर, राहुल इंगळे, श्रीकांत जगताप, उमेश इंगळे, प्रशांत इंगळे, स्वप्नील कोहर, अरुण तायडे, भगवान मागाडे, गणेश मागाडे, हरिदास गोपनारायण आदींनी भेट देऊन या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना नियमित रक्ताची आवश्यकता भासत असते. अशा रुग्णांसाठी सलग सहा वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करून धीरज इंगळे मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. या उपक्रमातून संकलित होणारे रक्त अकोला जिल्ह्यातील गरजू थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top