Mahabreaking

[breaking_news]

plastic removed: वाडेगावात गायीच्या पोटातून तब्बल ४५ किलो प्लास्टिक बाहेर; पशुवैद्यकीय दवाखान्यात यशस्वी शस्त्रक्रिया

plastic removed: बाळापूर तालुक्यातील पशुवैद्यकीय चिकित्सालय (स्था.), वाडेगाव येथे एका गायीवर रुमेनोटॉमी (Rumenotomy) ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान गायीच्या रुमेनमधून तब्बल ४० ते ४५ किलो प्लास्टिकच्या पिशव्या, दोर तसेच इतर अपचनीय वस्तू बाहेर काढण्यात आल्या. वाडेगावातच अशा प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने पशुपालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

plastic removed

प्लास्टिकच्या पिशव्या, दोर अन् अपचनीय वस्तूंचा खच; गायीच्या पोटातून ४० ते ४५ किलो कचरा बाहेर

राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील पशुवैद्यकीय चिकित्सालय (स्था.), वाडेगाव येथे एका गायीवर रुमेनोटॉमी (Rumenotomy) ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान गायीच्या रुमेनमधून तब्बल ४० ते ४५ किलो प्लास्टिकच्या पिशव्या, दोर तसेच इतर अपचनीय वस्तू बाहेर काढण्यात आल्या. वाडेगावातच अशा प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने पशुपालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

सदर गाय मोहम्मद अनिस मोहम्मद युनूस यांच्या मालकीची आहे. गायीच्या पोटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर अपचनीय वस्तू साचल्याने तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता. त्यामुळे पशुवैद्यकीय चिकित्सालयात तिच्यावर रुमेनोटॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली.
डॉ. गजेंद्र अंबळकर, डॉ. आकाश साकळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. गायीच्या पोटातून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर वस्तू बाहेर काढण्यात आल्याने जनावरांच्या आरोग्यासाठी प्लास्टिक कचरा किती घातक ठरू शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
जनावरांच्या आवाक्यात प्लास्टिक कचरा टाकू नका
शहर व ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला, कचराकुंड्यांमध्ये तसेच मोकळ्या जागेत टाकण्यात येणारा प्लास्टिक कचरा जनावरे खात असल्याचे प्रकार वारंवार समोर येतात. त्यामुळे नागरिकांनी जनावरांच्या आवाक्यात प्लास्टिक किंवा अन्य अपचनीय कचरा टाकू नये, यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
“जनावरांच्या आवाक्यात प्लास्टिकचा कचरा टाकू नये,” असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश साकळकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top