Mahabreaking

[breaking_news]

  SP Nilesh Tambe :गणेशोत्सव आणि आगामी सण-उत्सव शांततेत, एकोप्याने साजरे करा : एसपी निलेश तांबे

SP Nilesh Tambe : गणेशोत्सवासह आगामी राष्ट्रीय व धार्मिक सण-उत्सव एकोप्याने, शांततेत आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत साजरे करावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले. गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, तसेच शांतता समितीच्या सदस्यांनी युवा पिढीला मोबाईलवर कोणतेही आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्यापासून परावृत्त करावे, असेही त्यांनी सांगितले.

  SP Nilesh Tambe

  ‘आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करू नका’; गणेश मंडळांना पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

गजानन तिडके

देऊळगाव राजा : गणेशोत्सवासह आगामी राष्ट्रीय व धार्मिक सण-उत्सव एकोप्याने, शांततेत आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत साजरे करावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले. गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, तसेच शांतता समितीच्या सदस्यांनी युवा पिढीला मोबाईलवर कोणतेही आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्यापासून परावृत्त करावे, असेही त्यांनी सांगितले.

sp

देऊळगाव राजा येथील नगर परिषद टाऊन हॉलमध्ये ९ सप्टेंबर रोजी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना एसपी निलेश तांबे यांनी गणेश मंडळांनी केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता व्यसनमुक्ती, समाजजागृती आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन केले.

युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाण्यापासून परावृत्त व्हावी, यासाठी गणेश मंडळांनी समाजोपयोगी आणि जनजागृतीपर कार्यक्रम राबवावेत. आगामी सण-उत्सवांच्या काळात सर्व समाजघटकांनी परस्परांमध्ये बंधुभाव आणि सलोखा कायम ठेवून उत्सव साजरे करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

डीजेऐवजी पारंपरिक ढोल-ताशांचा वापर करा

जिल्हा पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड यांनी गणेश मंडळांनी डीजेऐवजी पारंपरिक बँड, ढोल-ताशांचा वापर करण्याचे आवाहन केले. पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिल्यास ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत होईल. तसेच ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना मोठ्या आवाजाचा त्रास होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांनीही सण-उत्सव साजरे करताना शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे, पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी, अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नागरे, वैद्यकीय अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार शशिकांत खेडेकर, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, गणेश मांटे, प्रकाश गिते, प्रवीण गिते, धनसिंग शिपने, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश खांडेभराड यांच्यासह शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शांतता समितीच्या सदस्यांनी बैठकीत विविध सूचना मांडल्या. पत्रकार सूरज गुप्ता यांनी गणेशोत्सवाच्या काळात प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने किमान एका गणेश मंडळाची जबाबदारी स्वीकारून मंडळाशी समन्वय साधावा, अशी सूचना केली.

पोलिस अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी व पत्रकारांची उपस्थिती

बैठकीला देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, दुसरबीड आणि अंढेरा येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सव आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय असणे आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.बैठकीचे संचालन व आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top