Mahabreaking

[breaking_news]

  Buddha Rashmi Mahavihara :भादोला येथे ‘बुद्ध रश्मी महाविहार’चा १२ सप्टेंबरला शीलान्यास व भूमिपूजन

Buddha Rashmi Mahavihara : तालुक्यातील भादोला येथे बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी ‘बुद्ध रश्मी महाविहार’ उभारण्यात येणार असून, या भव्य महाविहाराचा शीलान्यास व भूमिपूजन सोहळा शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

Buddha Rashmi Mahavihara

 धम्मप्रचाराला मिळणार नवी दिशा; भादोला येथे बुद्ध रश्मी महाविहाराची भव्य उभारणी

बुलढाणा :  तालुक्यातील भादोला येथे बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी ‘बुद्ध रश्मी महाविहार’ उभारण्यात येणार असून, या भव्य महाविहाराचा शीलान्यास व भूमिपूजन सोहळा शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात पूज्य भदंत यश यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असून, त्यानंतर शीलान्यासाचा कार्यक्रम होईल. सकाळी ११ वाजता महासंघदान, तर दुपारी १ वाजता परित्राणपाठ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी वृक्षारोपणही करण्यात येणार आहे.

बुद्ध रश्मी महाविहाराच्या माध्यमातून बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या भव्य विहारामध्ये धम्मप्रचारासाठी धम्म हॉल, चित्तशुद्धी व ध्यानसाधनेसाठी ध्यानसाधना केंद्र तसेच संघपरंपरा सक्षम करण्यासाठी धम्मदूतांची निर्मिती करणारे भव्य भिक्खू संघ व श्रामणेर निवास आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.

बौद्ध धर्माच्या त्रिपिटकातील ज्ञानपरंपरेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने या विहारामध्ये विविध पवित्र वास्तू उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे हा महाविहार धम्मप्रचार, धम्मशिक्षण, ध्यानसाधना आणि भिक्खू संघाच्या प्रशिक्षणासाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

या कार्यक्रमासाठी उदितन्यान भंते, ज्ञानरक्षित भंते, मैताजी भंते, विवेक भंते, शांतीचित्त भंते, यश भंते, धम्ममित्र भंते यांच्यासह भिक्खू संघातील अनेक भंतेजी उपस्थित राहणार आहेत.

धम्मदानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

बुद्ध धम्मामध्ये धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. त्यामुळे या पवित्र कार्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने धम्मदान करावे तसेच शीलान्यास व भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भंते यश यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top