Mahabreaking

[breaking_news]

auto-rickshaw drivers :रिक्षाचालकांसाठी शासनाची मोठी खुशखबर! ‘आनंद दिघे’ मंडळाचे सदस्य व्हा, विविध योजनांचा लाभ घ्या

auto-rickshaw drivers : राज्य शासनाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी सुरू केलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळा’च्या सदस्य नोंदणीचे फॉर्म अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) परवाना विभागात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या मंडळाचे सदस्यत्व घेऊन प्रवासी ऑटोचालकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे.

auto

 अकोल्यातील ६५ वर्षांवरील आठ रिक्षाचालक योजनेस पात्र; दोघांच्या खात्यात १० हजारांचे अनुदान जमा

आगाखान पठाण

अकोला : राज्य शासनाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी सुरू केलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळा’च्या सदस्य नोंदणीचे फॉर्म अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) परवाना विभागात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या मंडळाचे सदस्यत्व घेऊन प्रवासी ऑटोचालकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील ऑटो रिक्षा/मीटर टॅक्सी परवानाधारक चालकांना ‘निवृत्ती सन्मान’ योजनेंतर्गत १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. अकोला शहर व जिल्ह्यात आतापर्यंत ६५ वर्षांवरील आठ ऑटोचालक या योजनेसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी दोन ऑटोचालकांच्या बँक खात्यात प्रत्येकी १० हजार रुपयांचे अनुदान जमा झाले असल्याची माहिती ऑटोचालक मोहम्मद इलियास लोधी यांनी दिली.

कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून प्रवासी ऑटोचालकांना जीवन विमा, अपंगत्व विमा, कर्तव्य बजावताना दुखापत झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत, नवीन घर व वाहन कर्जावरील व्याजाची अंशतः प्रतिपूर्ती, आरोग्यविषयक लाभ, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच राज्य शासन निर्देशित इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित ऑटोचालकाकडे ऑटोचालक परवाना व बॅच तसेच प्रवासी वाहतूक परवाना असणे आवश्यक आहे. पात्र चालकांनी अकोला आरटीओ कार्यालयातील परवाना विभागातून अर्ज घेऊन मंडळाचे सदस्यत्व नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अकोला आरटीओ रवींद्र भुयार तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मोहम्मद समीर यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओ कार्यालयाचे वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक अनिरुद्ध देवधर यांनी ऑटोचालकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, शासनाच्या या कल्याणकारी योजनेचे ऑटोचालकांकडून स्वागत करण्यात येत असून, चालकांसाठी विविध सामाजिक व आर्थिक लाभ उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाच्या निर्णयाचे कौतुक करून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

‘आरटीओ कार्यालयात जाऊन सदस्य नोंदणी करणार’

राज्य शासनाने सुरू केलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सदस्य नोंदणीसाठी आपण आरटीओ कार्यालयात जाऊन अर्ज करणार असल्याचे ऑटोचालक मोहम्मद हाफिजोद्दीन सिराजोदिन यांनी सांगितले. हा निर्णय प्रवासी वाहतूक चालकांसाठी अत्यंत कल्याणकारी असून, शासनाच्या या निर्णयाचे आपण स्वागत करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top