Sarpanch : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पातूर तालुक्यातील सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पातूर तहसील कार्यालयातील नवीन इमारतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

सरपंच आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष; पातूर तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता प्रक्रिया
निशांत गवई
पातूर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पातूर तालुक्यातील सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पातूर तहसील कार्यालयातील नवीन इमारतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधील सरपंचपदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गासाठी एकूण ९१ सरपंचपदे राखीव ठेवण्यात आली असून, त्यापैकी ४८ पदे महिलांसाठी राखीव आहेत. तसेच खुल्या प्रवर्गातील २६७ सरपंचपदांपैकी १२९ पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
पातूर तालुक्यात एकूण ५७ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी २९ ग्रामपंचायतींची सरपंचपदे महिलांसाठी राखीव राहणार आहेत. तालुक्यातील सरपंचपदांपैकी सात पदे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव असून, त्यापैकी चार पदे महिलांसाठी राखीव आहेत. तसेच खुल्या प्रवर्गातील २९ सरपंचपदांपैकी १४ पदे महिलांसाठी राखीव राहणार आहेत.
आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेकडे पातूर तालुक्यातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच सरपंचपदासाठी इच्छुक उमेदवारांचे विशेष लक्ष लागले आहे. कोणत्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने तालुक्यातील राजकीय समीकरणांनाही काही प्रमाणात दिशा मिळणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेसाठी सर्व संबंधित नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

