minor girls marriage : डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटबोरी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी डोणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालविवाहाला आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई; घाटबोरीतील पाच जणांवर गुन्हा
डोणगाव : डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटबोरी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी डोणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटबोरी येथील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी शरद भागवतराव वानखडे (वय ४१, रा. बेलगाव) यांना समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रीती गवई यांच्याकडून या प्रकरणाबाबत लेखी माहिती प्राप्त झाली होती. संबंधित मुलीचा विवाह घाटबोरी येथील एका तरुणासोबत झाला असून, ती अल्पवयीन असताना गर्भवती असल्याचे आरोग्यवर्धिनी केंद्रातील नोंदीवरून निदर्शनास आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत बाल कल्याण समिती, बुलढाणा यांच्याकडे अहवाल सादर केला. त्यानंतर बाल कल्याण समितीने दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित मुलीचे समुपदेशन केले. चौकशीअंती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. मुलीच्या जन्मतारखेच्या नोंदीनुसार विवाहाच्या वेळी तिचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाल्याने बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणी अमोल राजू नवघरे, राजू नारायण नवघरे, नंदा राजू नवघरे (सर्व रा. घाटबोरी), भारत गोविंदा पवार आणि कमल भारत पवार (रा. आंध्रूड) या पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील कलम ९, १० व ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डोणगाव पोलीस करीत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

