water leakage: शहरातील बसस्थानकाच्या मागील मोकळ्या मैदानात भिंतीलगत असलेल्या नालीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाणी साचत असल्याने अस्वच्छतेची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच बसस्थानकातील पाण्याच्या टाकीचा पाइप गेल्या काही दिवसांपासून लिकेज असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. यामुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता.

आसिफ शाह यांच्या पुढाकाराने बसस्थानकातील पाणीगळती थांबली; प्रवाशांना दिलासा
बाळापूर : शहरातील बसस्थानकाच्या मागील मोकळ्या मैदानात भिंतीलगत असलेल्या नालीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाणी साचत असल्याने अस्वच्छतेची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच बसस्थानकातील पाण्याच्या टाकीचा पाइप गेल्या काही दिवसांपासून लिकेज असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. यामुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता.

रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा डीएसएसबी ग्रुपचे अध्यक्ष आसिफ शाह यांनी या समस्येकडे लक्ष देत पुढाकार घेतला. संबंधितांशी संपर्क साधून पाण्याच्या टाकीच्या पाइपची गळती तातडीने दुरुस्त करून घेतली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची नासाडी थांबली असून, बसस्थानकातील प्रवासी तसेच ऑटोचालकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, या कामासाठी पाणीपुरवठा अभियंता संजय मोकासरे यांनीही तत्परता दाखवित ठेकेदार व जलकर्मचाऱ्यांशी वारंवार संपर्क साधला. त्यांच्या समन्वयातून दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले.
बसस्थानकातील पाणीगळतीचा प्रश्न मार्गी लागल्याने प्रवासी व ऑटोचालकांनी समाधान व्यक्त केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते आसिफ शाह, पाणीपुरवठा अभियंता संजय मोकासरे, संबंधित ठेकेदार व जलकर्मचाऱ्यांचे आभार मानत त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले.
सुट्टीच्या दिवशीही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात आल्याने आसिफ शाह यांच्या सामाजिक कार्याचेही नागरिकांकडून कौतुक होत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

