Santosh Jadhav : मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंती महोत्सवाच्या समारोपप्रसंगी उत्कृष्ट पत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल घेत देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा दैनिक ‘नवराष्ट्र’ आणि ‘हॅलो बुलढाणा’चे तालुका प्रतिनिधी पत्रकार संतोष जाधव यांचा सन्मान करण्यात आला.

सामाजिक कार्याची दखल घेत पत्रकार संतोष जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
गजानन तिडके
देऊळगाव राजा : मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंती महोत्सवाच्या समारोपप्रसंगी उत्कृष्ट पत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल घेत देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा दैनिक ‘नवराष्ट्र’ आणि ‘हॅलो बुलढाणा’चे तालुका प्रतिनिधी पत्रकार संतोष जाधव यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोजभाऊ कायंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांतजी तुपकर, शिवसेना नेते विजुभाऊ अंभोरे, माजी आमदार तोताराम कायंदे आणि भाजपा प्रवक्ते विनोद वाघ यांच्या हस्ते पत्रकार संतोष जाधव यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची गाजलेली ‘फकीरा’ कादंबरी व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान दिल्याबद्दल संतोष जाधव यांच्या कार्याची यावेळी दखल घेण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते झालेल्या या सन्मानामुळे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाला समाजबांधवांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

