Mahabreaking

[breaking_news]

Burglary :पिपळगाव चिलमखाँ येथे घरफोडी; रोख रकमेसह दागिने लंपास

Burglary : तालुक्यातील पिपळगाव चिलमखाँ येथे अज्ञात चोरट्याने घरातील कपाट व लोखंडी पेटीतील रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Burglary

दिवसा घरातील लोखंडी पेटी फोडून ५८ हजारांचा ऐवज चोरीला

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : तालुक्यातील पिपळगाव चिलमखाँ येथे अज्ञात चोरट्याने घरातील कपाट व लोखंडी पेटीतील रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिपळगाव चिलमखाँ येथील रहिवासी व शेतकरी भानुदास शामराव खांडेभराड (वय ६०) यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तोंडी तक्रार दिली. ही चोरीची घटना दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.३० ते दुपारी २.३० वाजेदरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
अज्ञात चोरट्याने घरातील कपाट तसेच लोखंडी पेटीतील साहित्याची चोरी केली. चोरीस गेलेल्या मालामध्ये ४६ हजार रुपये रोख, सुमारे २ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, अंदाजे १० हजार रुपये किमतीची, तसेच लहान मुलाचे चांदीचे वाळे, हातातील कडे व अंगडी आदी वस्तूंचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत सुमारे ५८ हजार रुपये असल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात कायमी अप नंबर ४०४/२०२६, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५(अ) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची नोंद पोहेका भास्कर सानप यांनी केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका संजय गोरे करीत आहेत. घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top