Mahabreaking

[breaking_news]

Isha Pagore :राज्यस्तरीय तलवारबाजीत शिंदीच्या ईशा पागोरेला कांस्यपदक; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Isha Pagore : सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथील कु. ईशा निलेश पागोरे हिने राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करीत कांस्यपदक पटकावले आहे. तिच्या या यशामुळे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिची निवड झाली असून, ती जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. ईशाच्या या यशामुळे शिंदी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Isha Pagore

ग्रामीण भागातील ईशाची तलवारबाजीत चमकदार कामगिरी; आता जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथील कु. ईशा निलेश पागोरे हिने राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करीत कांस्यपदक पटकावले आहे. तिच्या या यशामुळे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिची निवड झाली असून, ती जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. ईशाच्या या यशामुळे शिंदी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

परभणी येथे दि. २१ ते २३ ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ईशाने सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि कांस्यपदकावर आपले नाव कोरले. तिच्या सातत्यपूर्ण व दमदार कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली आहे.

सध्या ईशा सोलापूर येथे शिक्षण घेत असून, तेथेच ती तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. तिचे वडील निलेश पागोरे हे केज तालुक्यात ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मुलीची खेळाविषयीची आवड आणि क्षमता ओळखून त्यांनी तिला सोलापूर येथील एका क्रीडा संस्थेत तलवारबाजीच्या प्रशिक्षणासाठी दाखल केले. पालकांचे प्रोत्साहन, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि ईशाची मेहनत यामुळे तिने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे.

यापूर्वीही ईशाने विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करून कांस्यपदक पटकावले आहे. आता राज्यस्तरीय स्पर्धेतील यशामुळे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली आहे.

ग्रामीण भागातून पुढे येत तलवारबाजीसारख्या क्रीडा प्रकारात राज्यस्तरावर यश संपादन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरणे ही शिंदी गावासाठी अभिमानाची बाब आहे. ईशाच्या या यशामागे तिचे पालक, मार्गदर्शक व प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान आहे.

कु. ईशा पागोरे हिच्या यशाबद्दल ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, क्रीडाप्रेमी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील मुलींनीही क्रीडा क्षेत्रात पुढे येऊन आपली प्रतिभा सिद्ध करावी, यासाठी ईशाचे हे यश निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top